फिफाचा फिव्हर हत्तीवरही

रणजित कालेकर
गुरुवार, 21 जून 2018

आजरा - जगभर फुटबॉल फिव्हर पसरला आहे. फुटबॉलच्या मॅच पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमी रात्र जागवत आहेत. वेळवट्टी (ता. आजरा) येथील महागावकर कुटुंबाला काल रात्री फुटबॉलचा मोठा रंजक सामना पाहायला मिळाला; पण या सामन्यात फुटबॉलपटू चक्क टस्कर हत्ती होता; तर चारचाकीचे टायर या खेळात त्याचा फुटबॉल होता. सुमारे दोन तास त्याचे फुटबॉल खेळणे सुरू होते. त्याचे फुटबॉल खेळातील पदलालित्य पाहून तो निष्णात फुटबॉलपटूंनाही भारी ठरेल, अशी त्याची शैली असल्याचे हषवर्धन महागावकर यांनी सांगितले. 

हर्षवर्धन महागावकर यांनी सांगितले, ""आजऱ्यातून अकरा वाजता वेळवट्टी येथील फॉर्म हाऊसवर पोचलो. या वेळी कुत्री भुंकत होती. त्या वेळी हत्ती आल्याचे संकेत मिळाले. शेतात कुठे तरी उसात हत्ती असावा याची खात्री झाली. घरी जेवण आवरून गच्चीवर फेरफटका मारायला गेल्यावर समोरील शेतवडीतून आवाज येऊ लागले. विजेरीचा झोत टाकला असता तो टायरशी खेळताना दिसला. घरातील सर्वांना याबाबतची कल्पना दिली. आम्ही सर्वजण गच्चीवर जमा झालो. तेथून विजेरीचे झोत टाकले. त्या वेळी तो गाडीचे टायर घेऊन समोरील शेतवडीत टायरला लाथा मारत असताना आढळला. जणू तो फुटबॉलच खेळत होता. त्याचे पदलालित्य एखाद्या निष्णात खेळाडूसारखे होते. तो पाठीमागील पायाने टायर हवेत भिरकावून देत होता. सुमारे दोन तास त्याचे फुटबॉल खेळणे सुरू होते. काही वेळानंतर फटाके अंगणात टाकल्यावर तो तिथून टायरसह निघून गेला. ओढ्याजवळील शेतवडीत त्याचे खेळणे सुरूच होते. त्याच्या खेळामुळे कुटुंबीयांचे मनोरंजनदेखील झाले.'' 

Web Title: fifa Elephant play football with Tyre