सोलापूर जिल्ह्यात आजअखेर 15 लाख वृक्षांची लागवड 

परशुराम कोकणे
मंगळवार, 23 जुलै 2019

सोलापूर - दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात शासकीय नोंदीनुसार फक्त 2.17 टक्के इतकेच वनक्षेत्र आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानामुळे जिल्ह्यात वनक्षेत्रात वाढ होत आहे.

यंदा या अभियानाला 1 जुलैपासून सुरवात झाली असून 30 सप्टेंबरअखेर जिल्ह्याला 85 लाख 65 वृक्षांची लागवड उद्दिष्ट आहे. आजअखेर जवळपास 15 लाख वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. 

सोलापूरसह अनेक ठिकाणी परतीचा पाऊस येतो, म्हणून यंदाच्या वर्षी शासनाने वृक्ष लागवडीचा कालावधी वाढविला आहे. वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागासोबतच इतर शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्थांनाही या वृक्ष लागवड अभियानात सहभागी करून घेण्यात आले आहे. खड्डे मारून त्याचे फोटो दाखवल्यास वन विभागाकडून रोपे देण्यात येत आहेत. झाडांच्या संवर्धनाची जबाबदारीही देण्यात येत आहे, त्यामुळे वनक्षेत्रात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात 85 लाख 65 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून आजअखेर जवळपास 15 लाख वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. 

वृक्षारोपण ही आता लोकचळवळ झाली आहे. रोज कोठे ना कोठे वृक्ष लागवड मोहीम शासन आणि वैयक्तिक स्तरावर सुरू असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या तुलनेत लोकांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत सकारात्मक बदल होत आहे. शासनाच्या अभियानामुळे आणि लोकजागृतीमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढत आहे. 
- सुवर्णा माने,  विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifteen lakh trees planted till date in Solapur district