भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत तिरंगी सामना 

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत तिरंगी सामना 

म्हैसाळ : बेडग गटातून विभाजित झालेल्या म्हैसाळ जि.प. गटासाठी ही पहिली लढत ठरणार आहे. येथे काँग्रेसला कै. केदारराव शिंदे यांची निश्‍चितपणे उणीव भासणार आहे. म्हैसाळवर पकड असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मनोज शिंदे यांनाही हा गट प्रतिष्ठेचा आहे. येथील स्थानिक राजकारणात आमदार सुरेश खाडे यांचा हस्तक्षेप येथील स्थानिक नेतृत्वाला न रुचणारा असल्याची चर्चा आहे. त्यांचे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक शिंदे म्हैसाळकर यांचे सख्य जगजाहीर आहे. त्यामुळे या गटात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असा तिरंगी सामना रंगणार हे निश्‍चित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा दोनवेळा या गटात झालेल्या पराभवाचे उट्टे काढणार का? याचीच जोरदार चर्चा आहे. 

भाजपमध्ये आमदार खाडे यांच्या इच्छुक समर्थक उमेदवारांस देखील शिंदे समर्थकातून विरोध आहे. म्हैसाळ जि. प. गट ओबीसी महिला, टाकळी पंचायत समिती गण ओबीसी खुला तर म्हैसाळ गण सर्वसाधारण खुला असे आरक्षण आहे. 

म्हैसाळ पं. स. गण खुला झालेने येथे अत्यंत चुरशीच्या लढतीची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडे डॉ. कैलास शिंदे, भगवानराव जगताप, भरतेश कबुरे, नरसिंह संगलगे, ग्रा. पं. सदस्य परेश शिंदे आणि मार्केट कमिटीचे माजी उपसभापती कैलाससिंह शिंदे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेसकडून ग्रा. पं. सदस्य दौलतराव शिंदे, पुष्पराज शिंदे इच्छुक आहेत. भाजपाकडून खासदार पाटील समर्थक ग्रा. पं. सदस्य दिलीप पाटील, शिंदे समर्थक नाना कांबळे व आमदार खाडे समर्थक धनंजय कुलकर्णी, तर शिवसेनेकडून अनुप घोरपडे इच्छुक आहेत. टाकळी गणातून राजेंद्र खोबरे, सुभाष हाक्के, जहांगीर जमादार, मन्सूर नदाफ, रमेश नंदीवाले, महादेव गुरव, वसंतराव सुतार व बाळासाहेब वाघमोडे आदी इच्छुक आहेत. म्हैसाळ जि. प. गटासाठी राष्ट्रवादीकडून श्रीमती आलम बुबनाळे, काँग्रेसकडून मिरज पं. स. च्या विद्यमान उपसभापती सौ. जयश्री कबुरे, तर भाजपाकडून विजयनगरच्या सौ. प्राजक्ता कोरे या इच्छुक आहेत. या गटात राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे (म्हैसाळकर) यांची म्हैसाळ ग्रामपंचायतीसह आर्थिक संस्थाच्या माध्यमातून चांगली पकड असून ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांचा भक्कम पाठिंबा आहे. काँग्रेसला कै. केदाराराव शिंदे यांची निश्‍चितपणे उणीव भासणार असून त्यांच्या पत्नी व जि. प. सदस्या श्रीमती अलकादेवी शिंदे म्हैसाळकर यांच्यावर काँग्रेसची भिस्त असणार आहे. 

शतप्रतिशत भाजपा अडचणीचे ? 
गावच्या स्थानिक राजकारणात हस्तक्षेप न करण्याच्या बदल्यात आमदारकीला मदत, असा अलिखित करार असताना त्यांचा जि. प. व पं. स. निवडणुकीच्या निमित्ताने मिरज मतदारसंघातील गावाच्या राजकारणात हस्तक्षेप त्यांना परवडणारा नाही. यामुळे येथे शतप्रतिशत भाजपा त्यांना अडचणीचे ठरण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com