नगर - ग्रामस्थ-मंडलाधिकाऱ्यांत बाचाबाची 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

तळेगाव दिघे (नगर) : कार्यालयात येत नसल्याने मंडलाधिकारी ए. आर. हिले यांना ग्रामसभेत ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. या वेळी ग्रामस्थ व मंडलाधिकारी हिले यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. मंडलाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. 

सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे ग्रामसभा झाली. "मंडलाधिकारी हिले कार्यालयात येत नाहीत, ग्रामस्थांना जुमानत नाहीत, अडवणूक व अरेरावी करतात,' असा आक्षेप सचिन दिघे यांनी घेतला. सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच अनिल कांदळकर, मच्छिंद्र दिघे, रमेश दिघे यांनीही याबाबत त्यांना जाब विचारला. त्यावर, "माझ्याकडे 21 गावांचा कार्यभार आहे,' असे हिले यांनी सांगितले. मात्र, त्याने ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. हिले यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली करावी, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. 

ग्रामसभेत अनधिकृत नळजोड असणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय झाला. निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्राबाहेर देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. निळवंडे धरणातून पाइपलाइनद्वारे तळेगावला पिण्यासाठी पाणी आणावे, असा ठराव करण्यात आला. 

या वेळी प्रभाकर कांदळकर, तुकाराम दिघे, गणेश दिघे, विकास गुरव, संपत दिघे, काशिनाथ जगताप, लता दिघे, मीना कदम, सूर्यभान दिघे, रामनाथ दिघे, ग्रामविकास अधिकारी शरद वावीकर, तलाठी संग्राम देशमुख, कृषी सहायक संदीप जोर्वेकर उपस्थित होते. 
 
Web Title: fight between citizens and divisional officer