पालिकेचे मुख्याधिकारी आणि माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी

karhad
karhad

कऱ्हाड : विजय दिवस समारोहानिमित्त काढण्यात येणाऱ्या विजय दौडला यंदा कऱ्हाड स्वच्छता दौड असे नामकरण करून पालिका व विजय दिवसातर्फे दौड काढण्यात आली. नेमका तोच मुद्दा येथे वादाचा ठरला.

पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे व विजय दिवस समारोह समितीचे सदस्य, माजी नगरसेवक विनायक विभुते यांच्या दत्त चौक व छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे जोरदार खडाजंगी झाली. पालिकेचे कर्मचारी विभुते यांच्या अंगावर धावून गेले. स्टेडीयमवर जमलेल्या शेकडो विद्यार्थी, नगराध्यक्षांसह अन्य मान्यवरांच्या समोर वादाची ठिणगी पडल्याने मोठाच गोंधळ उडाला. निवृत्त कर्नल संभाजी पाटील यांनी त्यात मध्यस्थी केल्याने त्या वादावर पडला पडला. मात्र त्याची शहरात जोरात चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com