Vidhan Sabha 2019 : प्रणिती शिंदेंविरोधात लढणार राष्ट्रवादीचा उमेदवार

प्रमोद बोडके
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांना उमेदवारी दिली असून या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

सोलापूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये पंढरपूर नंतर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांना उमेदवारी दिली असून या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या शहर मध्य विधानसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे सलग दोनवेळा आमदार झाल्या आहेत. आता त्या तिसऱ्यांदा नशीब आजमावत असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने जुबेर बागवान यांच्या माध्यमातून आज स्वतंत्र उमेदवार दिला आहे. अर्ज भरायच्या शेवटच्या टप्प्यात हा उमेदवार राष्ट्रवादीने दिला आहे. 

सोलापूर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी शहर उत्तर व शहर मध्य या दोन्ही मतदारसंघाची मागणी आम्ही केली होती. पक्षाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर मनोहर सपाटे यांना उमेदवारी दिली असून शहर मध्य मतदारसंघातून युवकचे अध्यक्ष जुबेर बागवान यांना संधी दिली आहे.
- संतोष पवार, कार्याध्यक्ष,  सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight between Praniti shinde and NCP Candidate