साताऱ्यात खंडणीसाठी मुख्याध्यापकास मारहाण

प्रवीण जाधव / सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 17 मे 2018

सातारा : पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकास शासकीय विश्रामगृहात बेदम मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे शहाराध्यक्ष सुनील काळेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरिदास जगदाळे यांच्यासह संदीप मेळाट व अन्य एका व्यक्तीच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात खंडणींचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अमोल एकनाथ कोळेकर (दिव्यनगरी, कोंडवे) यांनी फिर्याद दिली आहे.

हरिदास जगदाळे यांनी फोनवरून कोळेकर यांना शासकीय विश्रामगृहात बोलावले होते. त्यानुसार कोळेकर हे बुधवारी (ता. 16) दुपारी एक वाजता मित्र धनंजय शिंदे यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृहात गेले. जगदाळे यांनी त्यांना नऊ क्रमांकाच्या कक्षात बोलावून घेतले. त्या ठिकाणी जगदाळे, काळेकर, मेळाट व अन्य एकाने कोळेकर यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या साथीदाराच्या पत्नीचा विनयभंग केल्याचे जबरदस्तीने कबूल करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी कथित प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही दिल्याचे कोळेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: fight with principal for extortion in satara