या कारणावरून टॉमी, कोयत्याने दोन गटांत मारामारी 

Crime
Crime

पटवर्धन कुरोली (सोलापूर) : शेतातील रस्त्यावरील काटेरी झाडे काढणे व शेतीच्या इतर कारणावरून दोन गटांत टॉमी, कोयते, काठी व दगडाने झालेल्या मारामारीत चार जण जखमी झाले, तर 14 जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. हा प्रकार सोमवारी सकाळच्या सुमारास पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे घडला. 

काटेरी झाडे काढण्यावरून
फिर्यादी शहाजी मधुकर नाईकनवरे (रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर) यांच्या शेतातील रस्त्यावर काटेरी झाडे काढण्याच्या कारणावरून ब्रह्मदेव संपत्ती नाईकनवरे यांनी फिर्यादी शहाजी नाईकनवरे यांच्या डाव्या हातावर टॉमीने मारून जखमी केले. फिर्यादीची पत्नी अमृता शहाजी नाईकनवरे यांच्या डाव्या हाताच्या पंजावर कोयत्याने मारून जखमी केले, म्हणून ब्रह्मदेव संपत्ती नाईकनवरे, सिद्धेश्‍वर ब्रह्मदेव नाईकनवरे, महावीर बळीराम नाईकनवरे, राहुल अशोक नागणे (रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
हेही वाचा : विषबाधा झाल्याने दोन मुलांचा मृत्यू 
दुसऱ्या फिर्यादीत

दुसऱ्या फिर्यादीत शहाजी मधुकर नाईकनवरे, शिवाजी मधुकर नाईकनवरे, मधुकर धोंडिबा नाईकनवरे, शेशाबाई मधुकर नाईकनवरे, अमृता शहाजी नाईकनवरे, विजया शिवाजी नाईकनवरे (रा. पटवर्धन कुरोली), सागर गोरख उपासे, दत्ता गोरख उपासे, बालाजी पोपट उपासे, पोपट कृष्णा उपासे (रा. तरटगाव, ता. पंढरपूर) आदी 10 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून शेतीच्या कारणावरून फिर्यादी ब्रह्मदेव संपत्ती नाईकनवरे व मुलगा सिद्धेश्‍वर नाईकनवरे यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून डोक्‍यात कोयत्याने वार केले. 

हेही वाचा : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजुर
डाव्या खांद्यावर काठीने बेदम मारहाण

डाव्या हाताच्या मनगटावर काठीने वार करून गंभीर जखमी केले, शिवाय मुलगा सिद्धेश्‍वरच्या डाव्या खांद्यावर काठीने बेदम मारहाण केली. फिर्यादीचा चुलत भाऊ शंकर शिवदास नाईकनवरे यांच्या नाकावर व गुडघ्यावर मारून गंभीर जखमी केले म्हणून करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करकंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सलगर व हरिहर तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com