हिंदू एकता आंदोलनातर्फे एक हजार युवकांचा वीमा

सचिन शिंदे
बुधवार, 6 जून 2018

कऱ्हाड (सातारा) : अपघातात एखाद्या युवकावर वाईट प्रसंग आल्यास त्याच्या कुटुबियांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी हिंदू एकता आंदोलनतर्फे एक हजार युवकांचा वीमा उतरवण्यात येत आहे, अशी माहिती हिंदू एकता व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली. 

कऱ्हाड (सातारा) : अपघातात एखाद्या युवकावर वाईट प्रसंग आल्यास त्याच्या कुटुबियांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी हिंदू एकता आंदोलनतर्फे एक हजार युवकांचा वीमा उतरवण्यात येत आहे, अशी माहिती हिंदू एकता व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली. 

हिंदू एकता आंदोलन संघटनेतर्फे शहरी व ग्रामीण भागातील एक हजार युवकांचा प्रत्येकी दोन लाखांचा वीमा उतरवण्याच्या योजनेस आज येथे प्रारंभ झाला. त्यावेळी पावसकर बोलत होते. पावसकर व हिंदू एकतेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत जिरंगे यांच्या उपस्थीतीत उपक्रमास येथील कन्या प्रशालेसमोर प्रारंभ झाला. येथे प्रत्यक्षात नाव नोंदणीस सुरवात झाली. दिवसभरात अनेक युवकांची नोंद झाली.

यावेळी पुणे जनता बँकेचे अर्जुन वडतिले, प्रसाद ठाकूर व सुरेश कोसले संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश मुळे, कार्यवाहक राहुल यादव, शहराध्यक्ष प्रकाश जाधव, नगरसेवक सुहास जगताप, नगरसेविका सौ. विद्या पावसकर, नगरसेविका सौ. अंजली कुंभार उपस्थित होते. हिंदू एकता आंदोलन व शिवजयंती उत्सवास पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हिंदू एकताच्या आंदोलनतर्फे एक हजार युवकांना मोफत वीम उतरवण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदि विमा योजना राबवण्याचा संकल्प शिवजयंतीदिनी हिंदू एकता आंदोलनतर्फे भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जाहीर केला. त्यानुसार आज येथील कन्याशाळा येथे योजनेस प्रारंभ झाला.

पुणे जनता बँकेच्या सहकार्याने विमा उतरवण्यात येणार आहे. गरीब व कष्टकरी समाजातील अठराव्या वर्षापासून ५० वयोगटातील व्यक्तीचा वीम उतरवण्यात येणार आहे. संबधिताचा अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी म्हणून योजना राबविण्यात येत आहे. योजनेतंर्गत शहर व ग्रामीण मधील एक हजार युवकांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा मोफत विमा उतरण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष पावसकर म्हणाले, आजही समाजातील अनेक वर्गात विमा विषयी अज्ञान आहे. मात्र ज्या वेळी एखाद्या युवकावर अपघाताचा प्रसंग येतो. अशावेळी त्याच्या कुटुंबियांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी हिंदू एकता आंदोलनच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातही ही योजना राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

Web Title: filed 1 thousand youth insurance from hindu ekata andolan