शिवसैनिकांच्या दुहेरी हत्येप्रकरणी आमदार जगताप यांच्यासह चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

शिवसेनेचे केङगाव येथील शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आमदार  संग्राम जगताप, आमदार अरूण जगताप, आमदार शिवाजी कर्ङीले यांच्यासह ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

नगर : केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली. आमदार जगताप, बाळासाहेब कोतकर, डी. एम. कोतकर, संदीप गुंडाळ अशी अटक केल्यांची नावे आहेत. 

शिवसेनेचे केङगाव येथील शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आमदार  संग्राम जगताप, आमदार अरूण जगताप, आमदार शिवाजी कर्ङीले यांच्यासह ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

 जगताप पिता-पुत्र राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार असून कर्ङीलें भाजपाचे आमदार आहेत. संजय कोतकर यांचा मुलगा   संग्राम कोतकर (वय २५) याने फिर्याद दिली आहे. दरम्यान आज घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाङे व  उपनेते अनिल राठोड यांनी जिल्हा बंदीची हाक दिली आहे. त्यामुळे जिल्हाभरात अनेक गावांत बंद पुकारण्यात आला आहे.

Web Title: filed case against MLA Sangram Jagtap in murder case nagar