जमीन विक्री फसवणूक प्रकरणी साताऱ्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

खरेदीखत करून दिले असताना त्याच जमिनीची पुन्हा विक्रीकरून फसवणूक केल्याप्रकरणी खिंडवाडी (ता. सातारा) येथील सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा - एकदा खरेदीखत करून दिले असताना त्याच जमिनीची पुन्हा
विक्रीकरून फसवणूक केल्याप्रकरणी खिंडवाडी (ता. सातारा) येथील सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शंकर धोंडू शेळके, खंडेराव शंकर शेळके, बबई शंकर शेळके, मनीषा हणमंत
शेळके, सारिका मोहन गुजर, माया खंडेराव शेळके (सर्व रा. खिंडवाडी) अशी
त्यांची नावे आहेत. याबाबत सुनिल एकनाथ जाधव (रा. पुसेगाव, ता.खटाव)
यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांनी 2014 मध्ये खिंडवाडी परिसरात शेतजमीन खरेदी केली होती. ती जमीन त्यांनी खरेदी केली असल्याचे माहित असूनही संशयीतांनी 9 ऑगस्ट 2017 ते 26 जून 2018 या कालावधीत त्याच जमिनीचे खरेदीखत गोडोली येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मिसाळ आणि दिघे या नावाच्या व्यक्तींना करुन दिले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जाधव यांनी कागदपत्रे जमवली. त्यानंतर जमिनीचे पहिले खरेदीखत झाले असताना दुसऱ्यांदा खरेदीखत करून देऊन फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली. महिला उपनिरीक्षिक वंजारी तपास करत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: filed case in police about land fraud