कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदेेंना अपात्र करा - इमतियाज बागवान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

कऱ्हाड : येथील नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी घटनात्मक पदाच्या दुरूपयोग करून शासनाची दिशाभूल केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर पालिका कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अपात्र करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इमतियाज बागवान यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे. पालिकेच्या जावक रजीस्टरमध्ये खोट्या नोंदी केल्या आहेतच. त्याशिवाय त्या नोंदी खोट्या आहेत. याचे ज्ञान असतानाही तो खोटा दस्तएवज खरा असल्याचे भासवून तो चौकशीवेळी वापरल्याने त्यांच्या कारवाई करावी, अशी मागणी बागवान यांनी केली आहे. 

येथील पालिकेच्या जून 2017 मध्ये झालेल्या विशेष बैठक झाली होती. त्यात नगरसेवकांचे नातेवाईक अनाधिकृतरित्या बसले होते, असा अर्ज बागवान यांनी दिली आहे. त्यात नगराध्यक्षा शिंदे यांच्यासह अन्य अकरा नगरसेविकांवर आरोप आहे. त्यात नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी यांना अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.

जिल्हाधिकारी यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे त्या तक्रारीवर संबधित नगरसेविकांचा लेखी खुलासा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुख्याधिकारी यांनी त्या संबधितांना लेखी खुलासा देण्याच्या नोटीसा बजावल्या. 21 एप्रिल रोजी नगराध्यक्षा शिंदे यांच्यास अन्य नगरसेविकांनी एकत्रित म्हणणे मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे. त्यात जून 2017 मध्ये झालेल्या विशेष बैठकीत बसण्यासाठी संबधितांनी लेखी परवानगी मागितल्याचे नगराध्यक्षा यांनी म्हटले आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल झालेल्या लेखी खुलासा व त्यांनी म्हटल्याप्रमाणे लेखी परवनगीसाठी बागवान यांनी माहिती अधिकाराकाली अर्ज दिला होता. त्या अर्जात वरील माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांनी पुन्हा नगराध्यक्षा शिंदे यांनी घटनात्मक पदाचा गौरवापर केल्याची तक्रार करत त्यांच्या फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली आहे.  

बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार नगराध्यक्षांनी जुन 2017 परवनागी दिल्याच्या पत्राचा उल्लेख केला आहे. ते पत्र त्या तारखेचे नाही. तर प्रत्यक्षात एप्रिल 2018 चे पत्र आहे, म्हणजेच मुख्याधिकारी यांनी लेखी खुलासा मागितल्याच्या नोटीसा त्यांना मिळाल्या. त्यानंतर त्यांनी ते पत्र तयार करून जावक रजीस्टरमध्ये खाडाखेड करून ते जुन्या म्हणजे जुन 2017 च्या तारखेत नोदवले आहे. जावक रजीस्टरमध्ये कर्मचारी संघटनेने मागितलेला परवानगी ज्या मुळ व्यक्तीच्या नावाने आहे. त्याच व्यक्तीच्या नावाखाली खाडाखोड करून बनावट पत्र नोदंवले आहे. माहिती अधिकारात त्या बाबी स्पष्ट होत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षा शिंदे यांनी त्यांच्या घटनात्मकपदाचा गैरवापर करत खोटा दस्तएवेज तयार केला. तो दस्ताएवज खोटा आहे, याचे ज्ञान असतानाही तो चौकशीत खरा म्हणून वापरला आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे, त्याचबरोबर त्यांच्या फौजदारी दाखल करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी बागवान यांनी केली आहे. 

Web Title: filed criminal offense against karhad nagaradhyaksh rohini shinde said imtiyaj bagwan