शेटफळे सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

आटपाडी  - शेटफळे (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा प्रदीप क्षीरसागर सध्या मनमानी कारभार करत आहेत. सदस्यांना विश्वासात न घेता त्यांची मनमानी सुरू आहे. या कारणावरून ग्रामपंचायतीच्या बाराही सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे.

शेटफळे (ता. आटपाडी) येथे साडेतीन वर्षांपूर्वी भाजप आणि शिवसेनेत ग्रामपंचायत निवडणुक झाली होती. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत भाजपाने सात जागा मिळवीत  ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली होती. यावेळी पहिल्या दोन वर्षासाठी सरपंच म्हणून रेश्मा क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.  दोन वर्षानंतर रेश्मा यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे भाजपच्या नेतेमंडळीनी आणखी एका वर्षासाठी संधी वाढवली. तीन वर्षाचा कालावधी झाल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिला नाही. भाजपमधील नेतेमंडळीचे गेल्या काही दिवसापासून राजीनामा देण्यासाठी प्रयत्न चालले होते.  पण सरपंचांनी भाजपला रामराम करून शिवसेनेच्या गटाशी हातमिळवणी केली. त्यामुळे भाजप सदस्याचा विश्वास ठराव बारगळला. पण आता अखेर शिवसेना आणि भाजपचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. दोन्ही गटाच्या बाराही सदस्यांनी सरपंचांच्या विरोधात तहसीलदाराकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. ग्रामपंचायतीत एकूण तेरा सदस्य आहेत.

Web Title: filed a no-confidence motion on Shetphale Sarpanch