ध्वजस्तंभाचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

३०३ फूट उंच - सोमवारी होणार लोकार्पण सोहळा
कोल्हापूर - पोलिस उद्यानात उभारण्यात येत असलेल्या ३०३ फूट उंचीच्या आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ध्वजस्तंभाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या थोर वीरांचा इतिहास उद्यानात साकारला जात आहे. सोमवारी (ता. १ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अक्षयकुमार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ध्वजस्तंभाची संकल्पना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी हा स्तंभ कोल्हापुरातच उभा करण्याचा निर्धार केला. आवश्‍यक गोष्टींची पूर्तता करून ध्वजस्तंभास परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली.

प्रत्यक्षात स्तंभाच्या कामाला ५ फेब्रुवारी २०१६ ला सुरवात झाली. कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प यांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञानाचा वापर करून ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारला. 

उद्यानातील कारंजे, अशोकस्तंभ, म्युरल्स, सेल्फी पॉइंट यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. १ लाख चौरस फूट पोलिस उद्यानात हे काम सुरू आहे. प्रवेशद्वारावर १० फुटांचा अशोकस्तंभ उभा करण्यात आला आहे. राष्ट्रध्वजामधील तीन रंग कशाचे प्रतीक आहेत, याची माहिती देणारे फलक उभारण्यात येत आहेत. बाजूलाच २२ फुटी कारंजा उभारण्यात येत आहे. रात्री तेथे विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. 

येथील सेल्फी पॉइंट नागरिकांचे खास आकर्षण ठरणार आहे. काही अंतरावर १०० फुटांचा गॅदरिंग प्लाझा उभारण्यात येत आहे. बच्चे कंपनीसाठी दोन ठिकाणी चिल्ड्रन पार्क उभारले आहे. एका ठिकाणी पारंपरिक खेळ, तर दुसऱ्या ठिकाणी साहसी खेळाचे साहित्य आहे.

पाच जिल्ह्यांतील पोलिस बॅंड देणार सलामी
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीच्या ध्वज अनावरण समारंभावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण येथील पोलिस बॅंड सलामी देणार आहेत. यामध्ये ट्रॅम्पेट, कोरॅनेट, इम्पोरियम, ॲल्टो सॅक्‍सोफोन, बेस ड्रम, साइड ड्रम, सिबॉल आदी वाद्यवृंद साहित्यासह ६४ जणांचा समावेश आहे.

Web Title: Final phase of flag work