...अखेर "पॉर्न व्हिडिओ' व्हायरलचा ग्रुप "डिलीट' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

दोषींवर कारवाई करावी

या प्रकरणात कोणता अधिकारी दोषी आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात मी उपायुक्‍त अजयसिंह पवार यांच्याशी बोललो आहे व त्यांच्याकडून माहितीही घेतली आहे. कारवाईबाबत त्यांच्याशी बोलणे झाले आहे. 
- श्रीनिवास करली, सभागृह नेता 
सोलापूर महापालिका 

सोलापूर ः महापालिका अधिकाऱ्यांचा समावेश असलेला आणि "पॉर्न व्हिडिओ' व्हायरल झालेला ग्रुप तातडीने "डिलीट' करण्यात आला. या प्रकाराबद्दल महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आयुक्त दीपक तावरे या संदर्भात काय निर्णय घेतात, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. 

अरे बापरे... महापालिका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पाॅर्न व्हिडीअो

शासकीय कामकाजाच्या सूचना देण्यासाठी असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर "पॉर्न व्हिडिओ' व्हायरल झाल्यासंदर्भातील वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. त्यावेळी एकच खळबळ उडाली. हा प्रकार केवळ ग्रुपवर असलेल्या अधिकाऱ्यांना माहिती होता. बातमी प्रसिद्ध झाल्यावर मात्र पालिका वर्तुळात खळबळ उडाली. अनेकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. हा प्रकार चुकून झाला असला तरी दोषींवर काहीतरी कारवाई अपेक्षित आहे. काहीही न करता सर्वचजण गप्प बसले तर उद्या कुणीही काहीही टाकेल आणि चुकून झाले, असे म्हणेल, अशा प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. एखाद्याला "टार्गेट' करून त्रास देणाऱ्या काही जणांनी मात्र या प्रकाराबाबत बचावात्मक पवित्रा घेतला. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, या संदर्भात निश्‍चित कारवाई होईल, असे सांगण्यात आले. महाराष्ट्र 

अन कंसमामाचे पितळ उघडे...

चार वर्षांपूर्वी महिला कर्मचाऱ्याच्या संगणकावर अश्‍लील छायाचित्रे पाठविण्यात आल्याचा प्रकार 17 जानेवारी 2015 रोजी उघडकीस आला. हा कारही दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. श्री. मिस्त्री यांनी या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे हे प्रकरण सायबर विभागापर्यंत गेले होते. आता उघडकीस आलेल्या प्रकरणी ते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... finally "delete" group of porn videos 'viral'