पहा इंदोरीकरांचा खुलासा... 

सूर्यकांत वरकड
Wednesday, 19 February 2020

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख महाराज इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली होती. तसेच, जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रारअर्ज देऊन इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी काल (मंगळवारी) केली. 

नगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांना मुलाच्या जन्माबाबत आणि महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी नोटीस बजावली होती. इंदोरीकर महाराजांनी आज वकिलामार्फत त्या नोटिशीचा खुलासा जिल्हा रुग्णालयात सादर केला. 
याबाबत इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली होती. तसेच, जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रारअर्ज देऊन इंदोरीकर महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी काल (मंगळवारी) केली. 

वाचा : कृषी मंत्री आले राहीबाईंच्या घरी, म्हणाले, बियाणे 

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एम. मुरंबीकर यांनी 12 फेब्रुवारी रोजी इंदोरीकर यांना खुलासा सादर करण्यासाठी नोटीस पाठविली होती. नोटिशीची मुदत संपत आली, तरी इंदोरीकरांनी खुलासा सादर केला नव्हता. आज शिवजयंतीची सुटी असतानाही इंदोरीकर यांनी वकिलामार्फत बंद लिफाफ्यात खुलासा जिल्हा रुग्णालयात सादर केला. सुटी असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक नसल्याने अपघात कक्षात उपस्थित डॉ. जी. एस. ढाकणे यांच्याकडे हा लिफाफा देण्यात आला. खुलासा सादर करताना अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. त्यामुळे महाराजांनी खुलासापत्रात काय लिहिले आहे, हे समजू शकले नाही. 

वाचा : शिर्डी बाळाची अशी झाली चोरी पहा 

खुलाशाचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावाने आले आहे. त्यांच्या आदेशानुसार त्या पत्राचा स्वीकार केला; मात्र, तपशिलाबाबत माहिती नाही. 
- डॉ. एस. जी. ढाकणे, जिल्हा रुग्णालय  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finally indorikar disclosure submitted