अखेर रंगांची दुनिया झाली सुरु.... 

घनशाम नवाथे 
Saturday, 20 February 2021

गेल्या मार्च महिन्यापासून कवाडे बंद करुन बसलेली रंगांची दुनिया अखेर सुरु झाली. राज्यातील कला महाविद्यालये सुरु करायला परवानगी मिळाली आणि महाविद्यालयांचे वर्ग पुन्हा रंगाने बहरुन गेले. पुन्हा एकदा कॅनव्हास रंगू लागले. 

माधवनगर  : गेल्या मार्च महिन्यापासून कवाडे बंद करुन बसलेली रंगांची दुनिया अखेर सुरु झाली. राज्यातील कला महाविद्यालये सुरु करायला परवानगी मिळाली आणि महाविद्यालयांचे वर्ग पुन्हा रंगाने बहरुन गेले. पुन्हा एकदा कॅनव्हास रंगू लागले. 

15 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन सुरु झाले. शाळा महाविद्यालये बंद झाली. राज्यभरातील कला महाविद्यालयेही बंद करावी लागली. वर्ष संपत आले होते. परीक्षा तोंडावर आल्या असतानाच कला महाविद्यालये बंद झाली. त्यानंतर 1 ते 20 जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात आल्या. त्याही ऑनलाईन. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षांचा निकाल जाहिर झाला. सप्टेंबरपासून ऑनलाईन क्‍लास सुरु झाले, ते शासकीय परवानगी मिळेपर्यंत तसेच सुरु होते. 

दरम्यान, दहावी बारावीच्या निकालानंतर नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली खरी, पण यंदापासून ती पहिल्यांदाच केंद्रभुत पध्दतीने राबवण्यात आली. ती पूर्ण झाली. पण महाविद्यालये सुरु करायला परवानगी मिळाली नव्हती. ती मिळाली आणि अखेर 15 फेब्रुवारीपासून राज्यभरातील कला महाविद्यालये सुरु झाली. फाऊंडेशन, इलिमेंटरी, इंटरमिजीएट पेंटिंग, ऍडव्हान्स पेंटिंग, डिप्लोमा, एटीडी, शिल्पकला विभागाचे वर्ग आता उत्साहाने सुरु झालेत. 

चित्रकला आणि शिल्पकला हे विषय ऑनलाईन शिकवण्याचा आणि शिकण्याचे विषय नाहीत. त्यात प्रॅक्‍टिकल अत्यंत महत्वाचे होते आणि ऑनलाईनमध्ये तेच शक्‍य नव्हते. आता थेट वर्ग सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. 
- लक्ष्मण लोहार, प्राचार्य कलाविश्व महाविद्यालय, सांगली 

 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally the world of colors started ....