esakal | अजित पवारांनी पुर्ण केले साताऱ्यासाठीचे त्यांचे स्वप्न
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवारांनी पुर्ण केले साताऱ्यासाठीचे त्यांचे स्वप्न

जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज उभारणीसाठी सध्या पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या 25 एकर जागेवरच काम सुरू करा. जादा लागणारी जागा शासनाच्याच पाटबंधारे विभागाकडून दिली जाईल. तसेच अर्थसंकल्पात निधीचीही तरतूद केली जाईल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच आश्वासन दिले हाेते.

अजित पवारांनी पुर्ण केले साताऱ्यासाठीचे त्यांचे स्वप्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यातील शासकीय मेडिकल कॉलेजचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लावून त्यासाठी अर्थसंकल्पातून तरतूद करण्याचे वचन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारकरांना नुकतेच दिले हाेते. आज (शुक्रवार) पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना येत्या शैक्षणिक वर्षात 2020 - 2021 सातारा जिल्ह्यात शासकीय वैदयकीय महाविद्यालय सुरु करण्याचा मनाेदय व्यक्त केला आहे. 

साताऱ्याचे मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून रखडला आहे. तो प्रश्‍न निकाली लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सातारा येथील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मेडिकल काॅलेजचा प्रश्न साेडविण्यासाठी अनुकूलता दाखवली. त्यावेळी त्यांनी येथे मेडिकल कॉलेज सुरु व्हावे हे हे माझे स्वप्न आहे. ते मी पूर्ण करणारच, अशी ग्वाहीही दिली हाेती. या बैठकीस साताऱ्यातील खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह बांधकाम, पाटबंधारे विभागासह नियोजनचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित हाेते. 

साताऱ्यातील शासकीय मेडिकल कॉलेजचा गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आलो आहे. मेडिकल कॉलेजचा आराखडा प्रवेश प्रक्रिया पदनिर्मिती, होस्टेलची उभारणी याबाबत चर्चा करून ते अंतिम करण्यासोबतच अर्थसंकल्पातून निधीची तरतूद किती करावी लागेल, याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या कमराबंद बैठक घेतली हाेती. मेडिकल कॉलेजला पहिल्या टप्प्यात 80 ते 100 कोटींचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पातून दिला जाऊ शकतो असे संकेतही पवार यांनी दिले हाेते. 
 
दरम्यान येथील शासकीय मेडिकल कॉलेजसाठी लागणारी जादा जागा पाटबंधारे विभागाकडून दिली जाईल. सध्या उपलब्ध जागेत काम सुरू करावे, अशी सूचना काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केली हाेती. मुंबईत नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत  सातारा जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली हाेती. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍न आणि त्यांना लागणारा निधी याबाबत चर्चा झाली. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आज (शुक्रवार) पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना येत्या शैक्षणिक वर्षात 2020 - 2021 सातारा जिल्ह्यात शासकीय वैदयकीय महाविद्यालय सुरु करण्याचा मनाेदय व्यक्त केला आहे. येथे मेडिकल काॅलेज व्हावे यासाठी जिल्ह्यातील आजी - माजी लाेकप्रतिनिधींनी देखील सातत्याने पाठपूरावा ठेवला हाेता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकाराच्या पहिल्याच अर्थसंकल्पात मेडिकल काॅलेजसाठी सकारात्मकता दाखवली आहे. त्यानूसार आगामी काळात येथे मेडिकल काॅलेजचे कामकाज युद्धपातळीवर हाेईल तसेच आगामी शैक्षणिक वर्षांत येथे मेडिकल काॅलेजचे प्रवेश हाेतील अशी आशा आहे.

हेही वाचा : नाना पाटेकरांचे मल्हारने उलगडले अंतरंग

दरम्यान आजच्या अर्थसंकल्पात पाटण तालुक्यातील पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात 100 खाटांचे रुग्णालय उभारणे, महाबळेश्वर येथील वेण्णा लेकच्या सुशाेभिकरणासाठी तसेच पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणाच्या विकासासाठी 100 काेटींची तरतूद, पाटण येथे लाेकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक उभारणे आदींची घाेषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा :  कऱ्हाड ः आता पावसकरांनी 'या'मध्ये लक्ष घालू नये