#MarathaKrantiMorcha रोहन तोडकरच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

हेमंत पवार
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : मराठा आरक्षणासाठी कोपर खैरणे येथे आंदोलन झाले होते. त्यावेळी झालेल्यी मारहाणीत खोनोली -चाफळ (ता. पाटण) येथील युवक रोहन तोडकर याचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना आज येथे आर्थिक मदत देण्यात आली.

येथील दत्त चौकात त्याच मागणीसाठी येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनस्थळी तोडकर यांच्या कुटुंबियांना बोलावून मदतीचे धनादेश देण्यात आले. वर्धन अॅग्रोच्या वतीने 25 हजार, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याकडून 11 हजार, वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांतर्फे 22 हजार 800 व समन्वय समितीतर्फे पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. आंदोलनस्थळी येऊन आमदार आनंदराव पाटील यांनी रोहनच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Web Title: Financial Help for Rohan Todkar Family