धनश्री मल्टिस्टेट को ऑप-क्रेडीट सोसायटीची सक्वसाधारण सभा संपन्न

हुकूम मुलाणी
सोमवार, 30 जुलै 2018

मंगळवेढा - दुष्काळाच्या झळा तालुका सोसत असताना सुद्धा पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वास संपादन करून अनेक कुटूंबाचा आधारवड बनण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन अध्यक्षा प्रा.शोभाताई काळुंगे यांनी व्यक्त केले. धनश्री महिला बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 22 वी व धनश्री मल्टिस्टेट को ऑप-क्रेडीट सोसायटी लि. मंगळवेढा यांची 7 व्या संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

मंगळवेढा - दुष्काळाच्या झळा तालुका सोसत असताना सुद्धा पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वास संपादन करून अनेक कुटूंबाचा आधारवड बनण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन अध्यक्षा प्रा.शोभाताई काळुंगे यांनी व्यक्त केले. धनश्री महिला बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 22 वी व धनश्री मल्टिस्टेट को ऑप-क्रेडीट सोसायटी लि. मंगळवेढा यांची 7 व्या संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर प्रा शिवाजीराव काळुंगे, अ‍ॅड.बी.बी.जाधव, मारूती सावंत, प्रभाकर कलुबर्मे, राजाराम सावंत, ज्ञानदेव जावीर, युवराज गडदे, बाबुराव शिंदे, ईश्वर गडदे, उमाकांत कनशेट्टी, नारायण पाटील, लेखा परिक्षक आनंद करवंदे, निळकंठ वाघचौरे, चंद्रभागा परिवाराचे समाधान काळे,आप्पासो माळी, भगवान शिंदे, मानसिंग चव्हाण, समाधान घोडके, प्रभावती कनशेट्टी, राजलक्ष्मी गायकवाड, कल्पना गडदे, सुरेखा कलुबर्मे, यमुना शिंदे, गोकुळा जावीर, मनिषा कुंभार व अनेक मान्यवर उपस्थित होते. 

प्रा.शिवाजी काळुंगे म्हणाले, धनश्री पतसंस्था व मल्टिस्टेटच्या माध्यमातून अनेक गरजूवंताना कर्जपुरवठा करून त्यांच्या कार्याला हातभार दिला आहे. धनश्री पतसंस्था व धनश्री मल्टिस्टेट या दोन संस्थेतील थोडाफार नफा वर्षभर समाजासाठीही वापरत आहे. धनश्री परिवार व तालुक्यातील इतर मंडळींच्या सहभागाने ही पाणी परिषद यशस्वीरित्या पार पडली. पाणी फौंडेशन या स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांना धनश्री परिवाराच्यावतीने त्याठिकाणी काम करण्यासाठी 50 हजार रूपये मदत केली आहे. राईनपाडा येथे झालेल्या घटनेतील कुटुंबियांना प्रत्येक कुटुंबास 25 हजार रूपयाची मदत दिली होती. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षलागवड यासारखे अनेक सामाजिक उपक्रम धनश्री परिवार करत आहे. 

प्रास्ताविक ज्ञानदेव जावीर यांनी केले. धनश्री महिला पतसंस्थेचा मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत सरव्यवस्थापिका सुनिता सावंत व धनश्री मल्टिस्टेटचा इतिवृत्तांत सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांनी वाचून दाखवल्यानंतर उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. धनश्री महिला पतसंस्थेच्या 14 शाखेमधील व धनश्री मल्टिस्टेटच्या 21 शाखेमधील प्रत्येक शाखेअंतर्गत उत्कृष्ठ दोन खातेदार, उत्कृष्ठ पिग्मी एजंट, उत्कृष्ठ कर्मचारी, उत्कृष्ठ शाखेस सन्मानचिन्ह व रोप देवून त्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन उल्हास जाधव, राणी उन्हाळे व नितीन कदम यांनी केले.

Web Title: Finishing of the General Meeting of the Op-Credit Society at Dhanashree Multistate