FIR filed against 'that' carporator
FIR filed against 'that' carporator

'त्या' नगरसेवकाविरोधात गुन्हा 

इस्लामपूर (जि. सांगली) : मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्यावर खुर्ची घेऊन धावणाऱ्या राष्ट्रवादीचे नगरसेवक खंडेराव जाधव यांच्यावर आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून नगरपालिकेच्या वाहनाचा गैरवापर केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत स्वतः मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी जाधव यांच्यासह सतीश बबन मंडले, सुनील सावळाराम जाधव, सागर जाधव व राजभवन बीअरबारचा मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मुख्याधिकारी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नगरपालिकेची कचरा गोळा करण्यासाठी असलेली घंटागाडी (एमएच 10 सीआर 2448) हे वाहन या सर्वांनी संगनमत करून जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेश असताना कोरोनाबाधित क्षेत्रात घेऊन गेलेत. मद्याविक्रीचे दुकान उघडण्याची परवानगी नसताना राजभवन बारच्या मालकाने तो बार उघडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला आहे.

नगरसेवक जाधव यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी मालमत्तेचा गैर कारणासाठी वापर केला आहे. आपले आणि इतरांची व्यक्तिगत सुरक्षा धोक्‍यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याची घातक कृती केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्याकडे तपास आहे. मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना धमकी देणाऱ्या नगरसेवक खंडेराव जाधव यांनी अतिरिक्त जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला आहे. याची उद्या गुरुवारी (ता. 30) सुनावणी होणार आहे. 

पालिका कर्मचाऱ्यांकडून निषेध! 
मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार यांना नगरसेवक खंडेराव जाधव यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व खुर्ची घेऊन अंगावर धावून जात धमकी दिली आहे. याप्रकरणी आज नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी यांच्या वतीनेही या झालेल्या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com