मंगळवेढ्यात कृषी अधिकाऱ्यांवर अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

हुकूम मुलाणी
बुधवार, 3 एप्रिल 2019

मंगळवेढा - तालुका कृषी कार्यालयाने 2010-11 या कालावधीत शासकीय कामात संगनमताने 24 लाख 11 हजार 253 रक्कमेचा शासकीय अपहार केल्याप्रकरणी तब्बल 9 वर्षानंतर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यात दोन वरिष्ठ, 6 कनिष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. तर तालुक्यात राष्ट्रीय वृध्दापकाळ घोटाळ्यानंतर तालुका कृषी कार्यालयातील हा दुसरा सर्वात मोठा घोटाळा ठरला.  

पंढरपूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र कांबळे यांनी मंगळवेढा पोलिसात दोन तत्कालीन कृषी अधिकार्‍यांसह 27 कर्मचार्‍यांवर फिर्याद दाखल केली. दि.1 ते 29 एप्रिल 2011 यादरम्यान तालुक्यात विविध शासकीय कंपार्टमेंटची कामे करण्यात आली. प्रत्यक्ष ठरवून दिलेल्या मोजमापाप्रमाणे  कामे न करता कमी कामे करून शासकीय पैशाचा गैरव्यवहार केला. याबाबत चौकशी अधिकारी म्हणून सोलापूरचे आबासाहेब साबळे यांनी चौकशी केली असता यात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. या अहवालाची विभागाकडून पडताळणी केली असता कर्मचार्‍यांनी संगनमताने 24 लाख 11 हजार 253 रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. 

दरम्यान कारवाईच्या भितीने काही कर्मचाऱ्यांनी अटकपूर्व जामीन करून घेतला. गुन्हा दाखल झालेले अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे - तत्कालीन तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे व सुरेश गरूड, कृषी सहाय्यक-राजाराम ढेपे, कृषी पर्यवेक्षक-अशोक कांबळे, मंडल कृषी अधिकारी-दिलीप शेडगे, कृषी सहाय्यक-महादेव फराटे, कृषी पर्यवेक्षक-मधुकर चव्हाण, कृषी सहाय्यक-बाबासाहेब चौगुले, बाबासाहेब पाटील, प्रसेनजित जानराव, वालचंद भोई, रविंद्र सरसंबी, काशिनाथ भजनावळे, किरण मांगडे, शिवाप्पा देगील, लक्ष्मण डुम, भिमू माळी, रविंद्र आंदळकर, रामचंद्र एखतपुरे, प्रशांत कोळी, राजाराम मदने, दत्तू जाधव, अंकुश वाघमारे, गौतम बनसोडे, दत्तात्रय जाधव, हिंदुराव पवार, तानाजी लवटे, अभिजीत धेडे, प्रमोद चव्हाण आदी कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल झाले.

Web Title: An FIR has been lodged on agricultural officials in mangalwedha