करगणीत अग्नितांडव : आगीमध्ये सात दुकाने जळून खाक  

fire blast Kargani burnt down seven shops sangli marathi news
fire blast Kargani burnt down seven shops sangli marathi news

सांगली : करगणी तालुका आटपाडी येथे काल सायंकाळी शॉर्टसर्किटने दुकानाला आग लागली आहे. या आगीत सात दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये पशु खाद्य दुकान ,प्रमोद ट्रेडर्स, अक्षय ट्रेडर्स, सूर्यवंशी स्टील अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी, पंढरपुरी चहाचा  समावेश  आहे.  पहाटे पर्यंत दुकान विझवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती पहाटे सहा वाजता आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना यश मिळाले.

 आटपाडी भिऊ घाट रस्त्यावर रस्त्यालगत अरुण पांढरे यांच्या दुकानाला आग लागली ती आज बाकीच्या शेजारच्या दुकानाला लागून सात दुकाने अग्नी आगीत भस्मसात झाली असून दीड ते दोन कोटीचे नुकसान झाले. याबाबत सरपंच गणेश खंदारे  यांनी आमदार अनिल भाऊ बाबर यांना फोनवरून माहिती दिली होती अग्निशामक दलाची गाडी ही तेथे हजर झाली होती आग विझवण्यात यश आले आहे.
संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com