नेवाशात ऑईल कंपनीला आग

सुनील गर्जे
रविवार, 24 जून 2018

जीवित व आर्थिकहानी टळली
ऑईल कंपनीमध्ये रात्री दोन कामगार झोपतात. आग लागण्या अगोदर काही वेळापूर्वीच प्रतविधीला गेल्याने जीवितहानी तर आग लागली त्याठीकानाहून थोड्याच अंतरावर हजारो लिटरच्या ऑईलचे टाक्या होत्या. आगनिशाम्न जावांनाना आग आटोक्यात आणण्यात आलेल्या यशामुळे मोठी आर्थिकहानी टळली.

नेवासे : नेवासे-खडका फाटा रस्त्यावरील गजानन ऑईल कंपनीला शॉटसर्कीटने शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत हजारो रिकामे प्लास्टिक ड्रम जळाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेबाबत नेवासे पोलिसांत रविवार सकाळ पर्यंत कोणतीच तक्रार नव्हती. दरम्यान या ऑईल कंपनीची महसूल विभागात कोणतीही माहिती नसल्याचे महसूल व पोलीस विभागाने सांगितले आहे. 

नेवासे-खडके फाटा रस्त्यावर असलेल्या देवगड फाटा परिसरात असलेल्या गजानान ऑईल कंपनीच्या शेडमधून शनिवार (ता. २३) रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास धूर निघत असल्याचे अनिल रॉय या शेजारी राहत असलेल्या कामगाराच्या निदर्शनास आले. दरम्यान ऑईल मालक राजेश ललित यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी मुळा व ज्ञानेश्वर साखर कारखान्यांच्या आग्निशामान दलाला प्राचारण केल्यावर तब्बल दोनतासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. 

याबाबत माहिती अशी शुक्रवारी दिवसभर या ऑईल कंपनीचा वीज पुरवठा बंद होता. शनिवारी पहाटे अचानक वीज पुरवठा सुरळीत झाल्याने ऑईल कंपनी लगत गेलेल्या विजेच्या तारांतून ठिणग्या उडाल्याने आग लागल्याची माहिती आहे. या आगीत एक ते पाच लिटर ऑईलचे हजारो रोकामे ड्रम जळाले असल्याचा प्राथमिक अंदाज कामगारांनी व्यक्त केला.

जीवित व आर्थिकहानी टळली
ऑईल कंपनीमध्ये रात्री दोन कामगार झोपतात. आग लागण्या अगोदर काही वेळापूर्वीच प्रतविधीला गेल्याने जीवितहानी तर आग लागली त्याठीकानाहून थोड्याच अंतरावर हजारो लिटरच्या ऑईलचे टाक्या होत्या. आगनिशाम्न जावांनाना आग आटोक्यात आणण्यात आलेल्या यशामुळे मोठी आर्थिकहानी टळली.

एक दशकानंतर पुन्हा आग
सदर याच ऑईल कंपनीला २००९ मध्ये अशीच शॉटसर्कीटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याला तब्बल दहा वर्ष पुर्ण होत आले असतांनाच शॉटसर्कीटने आग लागण्याची पुनरावृत्ती झाली आहे. 

"घटनास्थळी भेट देवून पहाणी केली मात्र पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार आली नाही.
- डॉ. शरद गोर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक

"पुरवठा विभाग व महसूल विभागात पहाणी केली असता या कंपनीची कोणतीही नोंद नाही. किंवा त्यांनी परवानगीही मागितलेली नाही.
- बुद्धानंद दंडोरे,  पुरवठा निरीक्षक, नेवासे

"जिल्हा उद्योग केंद्राच्या अखत्यार असल्याने महसूलच्या परवानगीची गरज नाही. आपली कंपनी अधिकृत आहे. 
- राजेश ललीत, ऑईल कंपनी मालक

Web Title: fire in company at newase