सोलापूर : ठिणगी पडून कचरा डेपोला आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

सोलापूर : तुळजापूर रस्त्यावरील महापालिकेच्या कचरा डेपोला आग लागली. हाय होल्टेज वीजेच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडून ही मंगळवारी दुपारी लागलेली आग अद्याप विझलेली नाही. जवळपास पाच ते सहा एकर परिसरात ही आग लागली असून आग विझवण्यात बराच वेळ जाण्याची शक्‍यता असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले. 

मंगळवारी एकच्या सुमारास आग लागली. ऊनाच्या उष्णतेमुळे आणि वाऱ्यामुळे आग वाढत गेली. माहिती समजाच अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेतली. आग विझविण्याचे काम रात्री बारा वाजले तरी चालूच होते. जवळपास पाच ते सहा एकर परिसरात आग लागली असून विझविण्यासाठी आणखी बराच वेळ लागणार आहे. कचरा डेपोतील आग वाढत जावून कचरा प्रकल्पातील शिल्लक कचऱ्यालाही आग लागली. रात्रीपर्यंत शेकडो गाड्यांमधून पाणी मारण्यात आले होते. आग विझविण्याच्या कामासाठी उंचावरून गेलेल्या वीजेचा तारांचा धोका होवू नये म्हणून बोरामणी व परिसरातील गावांचा वीज पुरवठा दिवसभर खंडीत करण्यात आला होता. 
या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसले तरी धूरामुळे प्रचंड प्रदूषण झाले आहे. परिसरातील नागरिकांचा याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा होवू नये म्हणून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. 

तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडून आग लागली. ही आग विझण्यासाठी आणखी बराच वेळ लागण्याची शक्‍यता आहे. अशाप्रकारची घटना पुन्हा होवू नये वीजेचा तारा अंडर ग्राउंड टाकल्या पाहिजेत. तसेच उंच गेलेला कचरा ढकलून तारेपासून खाली घ्यायला हवा. 
- केदार आवटे, प्रमुख, अग्निशमन दल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire at dumping ground in solapur