गोकुळ संघाच्या टँकरला आग; चालक जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - गोकुळ शिरगाव येथे दुध संघासमोरच टँकरला आग लागण्याची घटना घडली आहे. या घटनेत टँकरचे दोन टायर जळाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. 

कोल्हापूर - गोकुळ शिरगाव येथे दुध संघासमोरच टँकरला आग लागण्याची घटना घडली आहे. या घटनेत टँकरचे दोन टायर जळाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोकुळ शिरगाव येथील दूधडेअरीच्या समोर टँकरचा चालक दुधाची पातळी तपासत होता. यावेळी वीज वाहिनीला स्पर्श होऊन चालकाला वीजेचा धक्का बसला. या घटनेत तो जखमी झाला. पण टँकरमध्ये वीजचा प्रवाह उतरल्याने शाॅर्टसर्किट होऊन टायरीला आग लागली. दरम्यान अग्नीशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. चालकाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire to Gokul Tanker; Driver injured