वाळव्यामध्ये घराला लागलेल्या आगीत सुमारे साडे तीन लाखाचे साहित्य खाक

महादेव अहिर
मंगळवार, 2 एप्रिल 2019

वाळवा - येथील हाळभागात राहणारे अनिल वसंत खवरे यांच्या घरात आज सकाळी सहाच्या सुमारास सिलिंडरमधील गॅसच्या गळतीने आग लागली. या आगीत संपूर्ण घर उध्वस्त झाले आहे. एक लाख 40 हजारांच्या रोकडीसह चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य, कपडे धान्य असे सुमारे साडेतीन लाखांचे साहित्य खाक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार हाळभागात अनिल खवरे याचे मजुर कुटुंब रहायला आहे. आज सकाळी सिलिंडरमधील गॅस संपल्यांनंतर श्री. खवरे यांनी नवीन सिलिंडर जोडला. तो जोडल्यानंतर शेगडी पेटवली. तोच सिलिंडरने पेट घेतला. स्फोट होईल या भितीने आगीवर नियंत्रणासाठी कोणी पुढे आले नाही. अखेर वीस मिनिटांनी सिलिंडर स्फोट झाला. स्फोटामुळे बाजुच्या घरांना तडेही गेले व आगही भडकली. 

आगीची घटना समजताच हुतात्मा कारखान्याची अग्निशमन गाडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर इस्लामपुर येथील अग्निशमन गाडीही दाखल झाली.  त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी मदत केली. 

खवरे यांच्या घरात लहान मुले होती. त्यातील लहान मुलगी ही घरातील गच्चीवर झोपली होती. तिला शेजारीच राहणाऱ्या राहुल कोल्हे यांनी धाडस करून वाचविले. 

Web Title: Fire incidence in Walava Taluka