कोल्हापूरः भन्साळींच्या 'पद्मावती' चित्रपटाचा सेट पेटवला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

या चित्रपटाचे चित्रिकरण कोल्हापूरजवळील मसाई पठारावर सुरु असताना, मंगळवारी रात्री 30 जणांच्या गटाने सेटवरील काही भाग पेटवला. तसेच गाड्यांची तोडफोड केली.

कोल्हापूर - बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या 'पदमावती' या चित्रपटाच्या सेटचा काही भाग मंगळवारी रात्री पेटविण्यात आला. तसेच काही गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.

पद्मावती चित्रपटाचे चित्रिकरण कोल्हापूरजवळील मसाई पठारावर सुरु असताना, मंगळवारी रात्री 30 जणांच्या गटाने सेटवरील काही भाग पेटवला. तसेच गाड्यांची तोडफोड केली. हिंदुत्ववादी संघटनांकडून हे कृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा या चित्रपटाला विरोध सुरु झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मसाई पठारावर बौद्ध लेण्या आहेत.

भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाला राजस्थानमध्येही चित्रीकरणादरम्यान विरोध करण्यात आला होता. रजपूत कर्णी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानमध्ये थांबविण्यात आले होते. तसेच त्यांनी राजस्थानमध्ये चित्रिकरण करणार नसल्याचे म्हटले होते.

Web Title: fire Padmavati shooting set at Masai pathar in Kolhapur

फोटो गॅलरी