सोलापुरात दोन ठिकाणी आग; दुकाने, कारखान्यातील साहित्य जळून खाक 

fire
fire

सोलापूर : रंगभवन परिसरातील भीषण आग लागून फर्निचरसह 16 दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील दोन टॉवेल कारखान्यांना आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे.

पहाटे सव्वातीनच्या सुमारास अग्निशमन दलास रंगभवन येथील आगीची वर्दी आली. त्यावेळी अग्निशमन पथक एमाआयडीसीमधील टॉवेल कारखान्यांना लागलेली आग विझवत होते. अग्निशमन दलाच्या पथकाने रंगभवन परिसरात धाव घेतली. तोवर बरीच दुकाने पेटली होती. रंगभवन चौकातील फस्ट चर्चसमोर ही दुकाने आहेत. या ठिकाणी फर्निचर, शोभेच्या वस्तू विक्रीची दुकाने आहेत. काही वेळातच दुकाने जळून खाक झाली. पाण्याचा मारा करून मागील बाजूस असलेली दुकाने आगीपासून वाचवण्यात यश आले आहे. सकाळपर्यंत आग विझवण्याचे काम सुरु होते. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

दरम्यान अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्येही दोन टॉवेल कारखान्यांना आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com