सोलापूर : सुशील नगरात शेडला आग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुशील नगरातील पत्रा शेडला आग लागली. या घटनेनंतर रॉकेलचा स्फोट झाल्याची अफवा परिसरात पसरली. अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

सोलापूर : भारती विद्यापीठ परिसरातील सुशील नगरात पत्रा शेडला आग लागून 70 हजारांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. नातेवाईकांनी आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुशील नगरातील पत्रा शेडला आग लागली. या घटनेनंतर रॉकेलचा स्फोट झाल्याची अफवा परिसरात पसरली. अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. ही आग नातेवाईकांनी लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पत्रा शेडमधील मंडप साहित्य जळाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत विजापूर नाका पोलिस चौकशी करीत आहेत.

Web Title: fire in Solapur