विटा-मायणी रस्त्यावर ट्रक पेटून तिघांचा होरपळून मृत्यू

दिलीप कोळी
शनिवार, 22 डिसेंबर 2018

विटा : विटा-मायणी रस्त्यावर चिखलहोळ फाटा (ता.खानापूर) हद्दीत कच्च्या सिमेंट कॉक्रीट भरलेला टँकर व बिस्कीटाने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर ट्रकने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकमधील तिघांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी एकच्या सुमारास झाला. 

सिमेंट कॉक्रीट भरून मायणीकडे  टँकर तर बिस्कीटे घेऊन विट्याकडे ट्रक निघाला होता. खानापूर हद्दीत चिखलहोळ फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडकेमुळे दोन्हीही वाहनांनी पेट घेतला. त्यात टँकरमधील एकजण व बिस्कीटच्या ट्रकमधील दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आग भयंकर  भीषण होती. अपघाताची माहिती मिळताच विटा व तासगांव येथील पालिकेच्या अग्निशमन दलाला बोलविण्यात आले.

तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. विटा व मायणीकडे जाणारी वाहनांची वाहतूक तीन तास ठप्प होती. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर जळून खाक झालेली वाहने काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी विटा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ व पोलिस कर्मचा- यांनी धाव घेतली. जळालेले मृतदेह ताब्यात घेतले. अपघातस्थळी तहसीलदार रंजना उंबरहंडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: fire at truck on vita mayani road 3 dies