जामखेडमध्ये गोळीबार; दोघांची प्रकृती चिंताजनक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

नगर : नगर जिल्ह्यातील जामखेङमध्ये आज सायंकाळी गोळीबार करण्यात आला. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यामधील बाजार समितीमध्ये गोळीबार झाला असून त्यामध्ये योगेश राळेभात वय (28)आणि राजेश राळेभात वय (२६) हे गंभीर जखमी आहेत. दोघेही चहा घेत असतानाच तोंडाला कपङा बांधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाङल्या. त्यानंतर वेगाने ते पसार झाले. 

जामखेड पोलीस घटनास्थळी आहेत आरोपी अज्ञात असून तो फरार आहे.

Web Title: Firing at Jamkhed, Two seriously injured