सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीसपदी फिरोज मुलाणी यांची निवड

दावल इनामदार
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

ब्रह्मपुरी (सोलापुर) : सोलापूर जिल्हा काँग्रेस आय कमिटीच्या जिल्हा सरचिटणीसपदी मंगळवेढा संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष फिरोज मुलाणी यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी फिरोज मुलाणी यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे.मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे,आ.भारत भालके, आ.सिध्दराम म्हेत्रे, आ.प्रणिती शिंदे व जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे विचार  जनते पर्यंत पोहचवुन पक्ष संघटना मजबूत करून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची विजयाची सलामी देणार असल्याचे नुतन जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी यांनी सांगितले.

यावेळी आ.भारत भालके, विजयव् खवतोडे, धनंजय खवतोडे व भारत नागणे, पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, काँग्रेसचे शहराध्यक्ष मारूती वाकडे, युवक कआँग्रसचे तालुकाध्यक्ष युवराज शिंदे, शहराध्यक्ष महेश दत्तू, काँग्रेस नेते मुरलीधर घुले, नगरसेवक सचिन शिंदे, आर पी आय प्रदेश उपाध्यक्ष पोपट पडवळे, लक्ष्मण हेंबाडे, शिवाजी सातपुते आदी उपस्थित होते.

Web Title: Firoz Mulani as District General Secretary of Solapur District Congress Committee