रयतच्या पहिल्या शाखेस मिळणार एक कोटीचा निधी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

कऱ्हाड : माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांची आज येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यामध्ये कालेतील रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या शाखेच्या वसतीगृह आणि शाळेच्या इमारतीच्या पुर्नबांधणीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन पवार यांनी खासदार शेट्टी व काले ग्रामस्थांना दिले.

काले येथे रयत शिक्षण संस्थेची पहिली शाखा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापना केली. त्या संस्थेच्या पहिल्या संचालक मंडळात कालेतील बहुतांशजणांचा समावेश होता. पहिल्या शाखेचे वसतीगृह आणि शाळेच्या इमारतीची पडझड झाली आहे. त्या इमारतीसाठी 1 कोटी 60 लाख रुपयांपर्यंत निधीची आवश्यकता आहे. त्यापार्श्वभुमीवर आज कालेचे सरपंच, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांची खासदार शेट्टी यांनी पवार यांच्यासमवेत भेट घडवुन दिली.

Web Title: The first branch of Rayat Education society will get one crore funds