मंगळवेढा ठरली क्रीडादिन साजरा करणारी पहिली नगरपालिका

हुकूम मुलाणी 
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नगरपालिका विद्यार्थीनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण ट्रॅक सूट आणि खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

- अनिता नागणे, सभापती, महिला बालकल्याण

मंगळवेढा : नगरपालिकेतील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय व आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग व्हावा आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठीच्या दृष्टिकोनातून खेळाची गोडी वाढावी म्हणून दर शनिवारी क्रीडादिन सुरू केला. या दिवशी विद्यार्थ्यांना फक्त खेळाचे धडे मिळणार आहेत. आठवड्यातील एक पूर्ण दिवस क्रीडादिन साजरा करणारी राज्यात नगरपालिका पहिलीच ठरली आहे.

क्रीडादिन साजरा करण्याचा निर्णय नगरपालिकेचे महिला व बाल कल्याण, सभापती अनिता विनायक नागणे यांनी  घेतला असून, नगरपालिकेच्या 8 शाळेत शहर व ग्रामीण भागातील 1390 विद्यार्थी शिक्षण घेतात. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून नगरपालिका शाळेने जिल्ह्यात नावलौकिक मिळवला असला तरीही पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना योग्य शरीरसंपदा राहावी, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी   शाळेत खेळाचे तास शासनाने ठरवून दिले आहेत. पण हे तास ठराविक शाळाच चांगल्या पद्धतीने राबवितात.

ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवली जात नाहीत. पण मंगळवेढा नगरपालिका शाळेने याची अंमलबजावणी करण्यात दृष्टीने दर शनिवारी पूर्ण दिवस खेळाला ठरविला. सकाळी शालेय प्रार्थना झाल्यानंतर पूर्ण तो दिवस खेळासाठी ठरवला आहे. शनिवारच्या सकाळच्या शाळेमुळे विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रासही कमी होणार आहे. त्यामुळे शनिवारी पूर्ण दिवसात खेळताना जखमी झाल्यास प्रथमोपचार पेटी महिला व बाल कल्याण समितीने दिली आहे. प्रथमोपचारोदेखील विद्यार्थीनीच करायचे असल्याने याची प्रभावी अमंलबजावणी होणार आहे. वर्षातून एकदा आठ शाळांमधून क्रीडा सप्ताह साजरा करून यातून विद्यार्थ्यांची खेळातील प्रगती तपासली जाणार आहे. याशिवाय योगाचे धडेही विद्यार्थीला दिले जाणार आहेत.

''खेळाला पोषक वातावरण निर्माण व्हावे व भविष्यातील क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना चांगले योगदान देता यावे म्हणून एक दिवस खेळासाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. याचा निश्चितच भविष्यात लाभ होईल''.

- सचिन अनंत कळवस, प्रशासन अधिकारी नगरपालिका

Web Title: First municipality to celebrate Mangalveda is a sports festival