पाणी आरक्षणासाठी देशातील पहिले फोन आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

सोलापूर : टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि सचिवांना तसेच त्यांच्या कार्यालयात फोन करणार आहेत, अशी माहिती किसान व वॅाटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

कदम म्हणाले, 28 जानेवारी 2019 रोजी दुपारी चार वाजता जवळा (ता. सांगोला) येथून गावातील एका शेतकऱ्याचा पहिला फोन मुख्यमंत्र्यांना जाईल व तेथून आंदोलनास सुरवात होईल. मागण्या मान्य होईपर्यंत हे फोन आंदोलन सुरु राहणार आहे. यादरम्यान गावांतून तसेच विविध शहरातून सभा आणि बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

टाटा व कोयना धरणातील 116 टिएमसी इतके हक्काचे पाणी पश्चिम महाराष्ट्र  मराठवाड्यातील दुष्काळी भागाला देण्याबाबत अहवाल सादर केला आहे. ते पाणी तत्काळ द्यावे, उजनी धरणातील पाणी प्रदुषित असल्याने टाटांची सहा धरणे व कोयना धरणातील हक्काचे पाणी सोलापूर, उस्मानाबादसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी आरक्षित करावे,
 नद्या स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी या नद्यांमध्ये टाटांच्या धरणातून किमान पर्यावरणीय प्रवाह तत्काळ सोडावा, पिण्यासाठी, जनावरांच्या पाण्यासाठी, फळबाग  व शेती टिकवण्यासाठी प्रत्येक तालुक्याला पाणी आरक्षण घोषित करावे, राज्यातील सर्व 105 उपसा सिंचन प्रकल्पांचे 100 टक्के वीजबील माफ व्हावे, कोयना वीज निर्मितीसाठी वळवायचे अतिरीक्त 25 टीएमसी
पाण्याचे फेरनियोजन करून हे पाणी कायम दुष्काळी असलेल्या तालुक्यांना द्यावे, दुष्काळी भागात पशुधन जगविण्यासाठी रोज किमान 15 किलो हिरवा चारा आणि सहा किलो सुका चारा शासनाने उपलब्ध करून द्यावा, या मागण्या असल्याचे कदम यांनी सांगितले.

Web Title: first phone agitation for water reservation