महाबळेश्वरमध्ये पडले पहिले 'हिमकण'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज (ता.11) वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे हिमकण जमा झाल्याचे पहावयास मिळाले. नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. असेच चित्र या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या टपांवर तसेच, झोपड्यांच्या छप्परांवर पहावयास मिळाले.

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज (ता.11) वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे हिमकण जमा झाल्याचे पहावयास मिळाले. नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. असेच चित्र या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या टपांवर तसेच, झोपड्यांच्या छप्परांवर पहावयास मिळाले.

गाड्यांचे टप व झोपड्यांचे छप्पर तसेच लिंगमाळा परिसरातील स्मृतीवन परिसर व तेथील रान फुले त्याच्या शेंगावर दवबिंदू गोठून तयार झालेल्या हिमकणांमुळे पांढरे झाल्याचे दिसत होते. दरम्यान थंडीच्या हंगामात या वर्षी हिमकण दिसण्याची हि पहिलीच वेळ असल्याने त्याबद्दल विशेष कुतूहल होते. त्याचा आनंद हि स्थानिकांसह फिरायला आलेल्या पर्यटकांनी घेतला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार आज या पर्यटन स्थळाचे किमान तपमान १३.५ अंश डिग्री सेल्सिअस आहे. दरम्यान वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात ते ३ ते ४ अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असण्याची शक्यता जाणकार शेतकरी वर्तवितात.
Image may contain: one or more people, people sitting and outdoor

गेले दोन दिवस या पर्यटनस्थळी गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी होती. काल रात्री गार वारे कमी झाले मात्र थंडीचा जोर वाढला होता. स्थानिकांसह ठिकठिकाणी शेकोटी भोवती बसल्याचे चित्र दिसत होते. गेले तीन दिवसांच्या थंडीमुळे शहर व वेण्णा तलाव परिसर चांगलाच गारठला होता. ठिकठिकाणी शेकोट्या करून नागरिक व पर्यटक शेकत बसल्याचे चित्र पहावयास मिळत होते. तर, महाबळेश्वर फिरावयास आलेले पर्यटक तर स्वत:ला व आपल्या सर्व परिवाराला लोकरी टोप्या, शाली, जर्किन्स, स्वेटर्स मध्ये लपेटून फिरताना पहावयास मिळत होते. याच सततच्या वाढणाऱ्या थंडीच्या कडाक्यामुळे वेण्णा तलाव परिसर चांगलाच गारठला होता. काही ठिकाणी तो गोठलाही होता. त्यामुळे दव बिंदू गोठून काही भागात हिमकण तयार झाल्याचे फारच सुंदर दृश्य पहावयास मिळत होते. Image may contain: plant, tree, outdoor and nature

वेण्णा तलावावर नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. ते गोळा करण्याचा आनंद आज अनेक हौशींनी घेतला असेच चित्र या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या टपांवर तसेच झोपड्यांच्या छप्परांवर पहावयास मिळाले. गाड्यांचे टप व झोपड्यांचे  छप्पर दवबिंदू गोठून तयार झालेल्या हिमकणांमुळे पांढरे झाल्याचे दिसत होते. दरम्यान थंडीच्या हंगामात या वर्षी हिमकण दिसण्याची हि पहिलीच वेळ आहे. दरम्यान आजही थंडीचा जोर येथे कायम आहे.

 

 

Web Title: First 'snowflake' falls in Mahabaleshwar