पहिलीच्या विद्यार्थ्यांची 19 खडी, कोटीपर्यंतच्या संख्येचे वाचन ! 

first standard students reading of the number of up to 19 khadi
first standard students reading of the number of up to 19 khadi

सोलापूर : जुळे सोलापुरातील रत्नमंजिरी सोसायटीतील गणेश नाईक प्राथमिक शाळेत 12 खडीऐवजी 19 खडीचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. शिक्षकांच्या विशेष प्रयत्नामुळे पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दहावीचे पुस्तक वाचता येत आहे, तसेच कोटीपर्यंतच्या संख्यांचे वाचन अगदी सहजरीत्या करीत आहेत. 

जुळे सोलापुरातील सामान्य कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांनी 1996 ला गणेश नाईक प्राथमिक शाळेची सुरवात केली. ज्ञानदानाचा प्रवास आज सुसज्ज तीन मजली इमारतीत 700 विद्यार्थ्यांपर्यंत पोचला आहे. मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार व अन्य उत्साही शिक्षक विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत आहेत. 

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किरण बाबर यांच्याकडून प्रेरणा घेऊन गणेश नाईक शाळेतील शिक्षकांनी 'मी वाचणारच..' हा उपक्रम राबवला. शाळेतील शिक्षिका स्मिता पाटील यांच्याकडे पहिलीचा वर्ग आहे. त्यांनी अवघ्या तीन महिन्यांत प्रत्येक मुलाला अक्षर ओळख होऊन वाचता यावे यासाठी परिश्रम घेतले. श्री. बाबर यांनी सांगितल्याप्रमाणे, 12 खडीऐवजी 19 खडीचा वापर करण्यात आला. यात स्वर, व्यंजन यांचा समावेश आहे. अ ते ज्ञ सर्व अक्षरे कृतीयुक्त शिकवली आहेत. त्यामुळे मुलांचे मनोरंजन तर होतच आहे, शिवाय कृतीयुक्त अक्षर ओळख घेतल्याने मुलांना कंटाळा न येता ती आनंदाने शिकत आहेत. 




अक्षर ओळख व्यवस्थित झाल्याने पहिलीची मुले अगदी दहावी बारावीच्या पुस्तकातील धड्यांचे वाचन जोडशब्दासह न अडखळता करू लागली आहेत. आज या विद्यार्थ्यांचे अक्षरज्ञान विकसित झाल्याने शिक्षकांचे व पालकांचे 80 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागणार आहे आणि भरपूर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला लिहिता वाचता आले पाहिजे हेच शिक्षणाचे गमक आहे, असे शिक्षिका पाटील यांनी सांगितले. 

पहिलीच्या वर्गात मुलांना अक्षरओळख व्यवस्थित झाली नाही तर लहान मुलांत न्यूनगंड निर्माण होतो, आपल्याला वाचता येत नाही असे वाटून ते मूल अभ्यासापासून लांब जाऊ लागते. हे ओळखूनच शाळेतील आम्ही विशेष प्रयत्न करून वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे तयार केले आहे. आज पहिलीतील सर्व विद्यार्थी व्यवस्थित वाचत आहेत. पहिलीतील विद्यार्थी कोटीपर्यंतच्या संख्यांचे वाचन करू लागली आहेत. येणाऱ्या काळात शाळेत दाखल झालेला प्रत्येक विद्यार्थी गुणवंत घडेल यात काहीच शंका नाही. 
- स्मिता पाटील, शिक्षिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com