बेळगावातील खासबाग बाजारात आज पहिल्यांदाच पूर्णपणे शुकशुकाट...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

 दर रविवारी पाय ठेवण्यासही जागा मिळत नसलेल्या बाजार पेठेत कोणीही नसल्याने बाजार निर्मनुष्य दिसून येत आहे. 
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेलाच दोन हात करुन कोरोनाचा मुकाबला करा असे आवाहन करुन जनतेने आपल्यासाठीच कर्फ्यु करावा अशी साद घातली होती.

बेळगाव - शहरातील सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून ओळख असलेल्या खासबाग बाजारात आज पहिल्यांदाच पूर्णपणे शुकशुकाट पसरला आहे.

 दर रविवारी पाय ठेवण्यासही जागा मिळत नसलेल्या बाजार पेठेत कोणीही नसल्याने बाजार निर्मनुष्य दिसून येत आहे. 
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेलाच दोन हात करुन कोरोनाचा मुकाबला करा असे आवाहन करुन जनतेने आपल्यासाठीच कर्फ्यु करावा अशी साद घातली होती. याला जनतेने प्रतिसाद देवून शहर आणि परिसरातील नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवीत कर्फ्यु यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळेच सकाळपासूनच शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. तसेच शहरात बंद पुकारण्यात आला तरी खासबागच्या आठ्वडी बाजारात भाजीपाला आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते मात्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि कोरोनाला दूर ठेवण्याचा संकल्प करीत खासबागचा आठ्वडी बाजार बंद ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने आदेश जाहीर करीत यात्रा व बाजार बंद ठेवण्याची सूचना केली होती त्यानुसार बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

 अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच खासबाग बाजार बंद ठेवण्यात आला आहे.शहरातील नागरीकांनी सातच्या आत घरात राहून बाहेर पडणे पसंद न केल्याने शहरात सन्नाटा पसरला आहे. त्यामुळे शहापूर, खासबाग, वडगाव भागात पूर्णपणे बंद यशस्वी झाला आहे.

याच परिसरात घर असल्याने लहान पनापासून खासबागचा बाजार जवळून पाहिला आहे मात्र आज पहिल्यांदाच बाजार पूर्णपणे बंद आहे. कोरोनाबाबत काळजी घेतलीच पाहिजे. 
बापू जाधव - खासबाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time Khasbagh market in the Belgaum are closed