मासे खाताहेत भाव !

राजाराम माने
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

केतूर (जि. सोलापूर) - आषाढ महिना शेवटच्या टप्प्यावर आला असून, रविवारपासून (ता. 12) श्रावण सुरू होत आहे. या महिन्यात मांसाहार वर्ज्य करणारे अनेक लोक असल्यामुळे सध्या मांसाहाराला मागणी वाढली आहे. चिलापी प्रतिकिलो 110, तर मरळ 400 वर पोचला आहे.

मागणी जास्त आणि रोजच सुटणाऱ्या वाऱ्यामुळे मच्छीमारांना मासे सापडण्याचे कमी झालेले प्रमाण या विषम परिस्थितीमुळे माशांचे दर कडाडले आहेत. खवय्यांच्या खिशाला चाट बसत असली, तरी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मच्छी मार्केटला ग्राहकांची गर्दी वाढत आहे.

बोकडाच्या मटणाचा दर 420 ते 440 रुपयांवर गेला आहे. तर गावरान कोंबडा-कोंबडी मिळणे मुश्‍कील झाले आहे. त्याचा दर आवाक्‍याबाहेर आहे. कोंबडी 400 ते 450, तर कोंबडा 450 ते 500 रुपये नगावर गेला आहे. चिकनचे दर मात्र 180 ते 200 रुपयांवर स्थिर आहेत.

माशांचे भिगवण मच्छी मार्केट दर
सध्याचे दर, कंसात 15 दिवसांपूर्वीचे दर (प्रतिकिलो)

चिलापी मोठी - 100 ते 110 (40 ते 50)
चिलापी मध्यम - 60 ते 70 (20 ते 30)
चिलापी लहान - 35 ते 40 (10 ते 15)
मरळ - 350 ते 400 (200 ते 250)
वाम - 400 ते 450 (250 ते 270)
राहू - 200 ते 250 (110 ते 125)
गुगळी - 250 ते 300 (200 ते 210)
शिंगटा - 150 ते 180 (80 ते 90)

Web Title: fish rate increase