अबब...! मत्स्य व्यवसायात 80 टक्‍क्‍यांनी घट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

0 दुष्काळाचा मत्स्य व्यवसायात परिणाम 
0 तलावात केल्या जाणारी मासेमारी सुमारे अडीच हजार टन 
0 जिल्ह्यातील 130 मच्छीमार संस्था
0 सलग दोन वर्ष सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती

सोलापूर : राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असणारा आणि पावसाने दडी मारल्यानंतर टॅंकरने पाणी पिणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यात सलग दोन वर्षे दुष्काळ पडल्याने जिल्ह्याच्या शेती, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. तलावात केल्या जाणाऱ्या मासेमारीचे जिल्ह्याचे सरासरी मत्स्य उत्पादन अडीच हजार टनांच्या आसपास असून (उजनी वगळून) दोन वर्षांच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात 80 ते 90 टक्‍क्‍यांची घट झाली आहे.

कोल्हापुरातील या साखर कारखान्याचे रोखले गाळप परवाने

 भीमा, नीरा, माण, सीना, भोगावती या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असल्या तरीही सीना आणि भीमा या दोन नद्यांवरच मासेमारी होते. जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी जलसंपदा विभागाचे 80 तलाव असून या तलावाचे जलक्षेत्र नऊ हजार 340 हेक्‍टर एवढे आहे. ग्रामपंचायत, महापालिका व जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांकडील तलावांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण जलक्षेत्र 30 हजार 685 हेक्‍टर एवढे आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने कटला, रोहू, मिृगल या जातीच्या माशांचे उत्पादन घेतले जाते. राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने उजनी येथील मत्स्यबीज केंद्रावर दरवर्षी सहा ते सात कोटी मत्स्यबीजांची निर्मिती केली जाते.

"या" महापालिकेतील तिसरा डोळा उघडा; ७६६ गैरप्रकार आले "नजरेत"

आकडे बोलतात... 
- जिल्ह्यातील मच्छीमार संस्था : 130 
- जिल्ह्यातील मच्छीमार सभासद : 5 हजार पाच 
- जिल्ह्याचे सरासरी मत्स्य उत्पादन : 2500 टन 
- मत्स्य व्यवसायासाठी जलसंपदा विभागाचे तलाव : 80 

'शेतकऱ्यांचा अंत न पाहता ऊस दर जाहीर करा'

व्यावसायिकांना दिलासा 
मासेमारीचा व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांप्रमाणे क्रेडिट कार्ड योजना, घरकुल योजना, अपघात विमा योजना हाती घेतली आहे. दुष्काळामुळे मत्स्य व्यवसायावर मोठे संकट आले होते. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील तलावात पाणी उपलब्ध झाल्याने मत्स्य व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. 
- राजकुमार महाडीक, प्र. मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त 

नीलक्रांतीवर विश्वास 
सलग दोन वर्षे पडलेल्या दुष्काळामुळे मत्स्य व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने मत्स्य व्यावसायिकांसाठी नीलक्रांती योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल असा विश्‍वास आहे. 
- हर्षराज शिंदे, मत्स्य व्यावसायिक, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fisheries business down by 80 percent