जामखेड हत्याकांड प्रकरणी माजी सरपंचासह पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

कैलास विलास माने (वय 46 रा. तपनेश्वर रोड, जामखेड) प्रकाश विलास माने (वय 44 रा. तपनेश्वर रोड, जामखेड) यांना खून व कटाच्या गुन्ह्यात अटक केले. दत्ता रंगनाथ गायकवाड (वय 50 रा तेलंगशी, ता. जामखेड) सचिन गोरख जाधव (वय 34  रा भांडेवाडी कर्जत) बापू रामचंद्र काळे (वय 50 रा नेर्ले ता. करमाळा जि. सोलापूर ) यांनी आरोपींना आश्रय दिल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

जामखेङ : जामखेड येथील योगेश व राकेश राळेभात यांच्या हत्येप्रकरणी काल रात्री पाच जणांना अटक केली. मात्र, मुख्य आरोपीसह सूत्रधार अद्याप पसार आहेत. 

कैलास विलास माने (वय 46 रा. तपनेश्वर रोड, जामखेड) प्रकाश विलास माने (वय 44 रा. तपनेश्वर रोड, जामखेड) यांना खून व कटाच्या गुन्ह्यात अटक केले. दत्ता रंगनाथ गायकवाड (वय 50 रा तेलंगशी, ता. जामखेड) सचिन गोरख जाधव (वय 34  रा भांडेवाडी कर्जत) बापू रामचंद्र काळे (वय 50 रा नेर्ले ता. करमाळा जि. सोलापूर ) यांनी आरोपींना आश्रय दिल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

याबाबत कृष्णा अंबादास राळेभात(रा. मोरेवस्ती, जामखेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गोविंद दत्ता गायकवाड(रा. तेलंगशी) यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. योगेश राळेभात व राकेश राळेभात जामखेड बाजार समितीच्या आवारातील काळेच्या हॉटेलवर सायंकाळी गप्पा मारत असताना गोविंद दत्ता गायकवाड यांच्यासह दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी गोळ्या घातल्या, असे राकेश राळेभात याने जमखी अवस्थेत असताना कृष्णा राळेभात यांना सांगितले. एक वर्षापूर्वी योगेश व राकेश यांचे उल्हास माने यांच्या तलामीतील मुलांबरोबर राजकीय बोर्ड लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्याच वादाच्या कारणावरून पिस्तूलातून गोळ्या झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: five arrested in Jamkhed murder case