
आष्टा शहरात पाच कोटींच्या रस्ते कामाचा विषय गाजत आहे. प्रशासन व कारभारी यांच्यातील मतभेदांमुळे हे प्रश्न प्रलंबित असल्याची चर्चा आहेत.
आष्टा (जि. सांगली ) ः शहरात पाच कोटींच्या रस्ते कामाचा विषय गाजत आहे. रस्त्यांना मंजुरी ते टेंडरपर्यंतच्या खलबत्त्यांना उत आला आहे. पालिका प्रशासन व कारभारी यांच्यातील मतभेदांमुळे हे प्रश्न प्रलंबित असल्याची चर्चा आहेत. टेंडर भरली ती फुटणार का? की रस्ते टेंडरच्या लिफाफात बंद होणार, असा सवाल तीस वर्षांपासून प्रतीक्षेत असणारे मळे भागातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.
विधानसभा निवडणुकीवेळी मळे भागातील शेतकऱ्यांनी आमदार जयंत पाटील यांच्या पुढे परिसरातील रस्ते डांबरी करण्याची मागणी केली होती. या रस्त्यांची निकड ओळखून मंत्री पाटील यांनी रस्त्यासाठी पाच कोटींचा प्रस्ताव घेऊन त्याला मंजुरी दिली. जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मिळाला असल्याने पहिल्यांदाच सत्ताधारी शिंदे गटाच्या व मंत्रिगटाच्या काही जणांनी एकत्रित येत या रस्त्यांची यादी बनवली.
महात्मा गांधी शाळा ते कोटीवाणी वस्ती 11 लाख, बावची-बागणी रस्ता ते नलावडे मला 19 लाख, नाना मोरे ते जगताप मळा रस्ता 31 लाख, वुडलॅंड धाबा ते साळुंखे वस्ती 31 लाख, शेळके मळा ते हिरुगडे पाणंद 56 लाख, विश्वास खोत घर ते गायकवाड घर दहा लाख, अहिल्यादेवी सोसायटी ते दुधगाव शिव 37 लाख, राहुल मोरे रोड ते लालगे मळा 26 लाख, मिरजवेस ते कळसआप्पा मळा 37 लाख, हिंदू स्मशानभूमी ते बसुगडे मळा 62 लाख, वाळवा रोड ते आरगडे मळा 32 लाख, महिमान मळा ते माने वस्ती 11 लाख, दुधगाव रस्ता शेवाळकर वस्ती वीस लाख, असा चार कोटी चाळीस लाख आठ हजार 319 रुपये व बगीचे यादीवरून तर शिंदे व पाटील गटातील ज्येष्ठ नाराजी पसरली.
तोंडे पाहून कामे होतात, विश्वासात घेतले जात नाही, असा सूर निघाला, नव्हे तर यावरून शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष व मंत्री गटाचे बॅंकेचे माजी अध्यक्ष यांच्यात मुख्याधिकारी केबिनमध्येच एकेरी भाषेत दमदाटी, अंगावर धावून जाण्याचे प्रकार झाले.
हा संदेश मंत्री पाटील यांच्यापर्यंत पोचला. शहरभर रस्त्यांच्या कामाची चर्चा रंगली. कोरोना, निवडणुका या दरम्यान रस्ते कामावरून पुलाखालून बरेच पाणी गेलेय पदवीधर निवडणुकीनंतर रस्ते कामे सुरू होतील, अशी ग्वाही प्रशासनाची होतीय. याबाबतचे टेंडरही निघाल्याचा चर्चा पालिका वर्तुळात होत्या; मात्र टेंडर कुणाला? यावरून आता दोन्ही गटात ठिणगी पडल्याची चर्चा आहे. टेंडर ठेकेदार यावरून विषय पेटला आहे.
संपादन : युवराज यादव