शेतकर्यांनी केले पाच दिवसात दीड हजार फोन 

संतोष सिरसट
मंगळवार, 20 जून 2017

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमाद्वारे व सोशल मिडियाच्या माध्यमातून आपला मोबाईल क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला होता. त्या फोनवर गेल्या पाच दिवसांमध्ये जवळपास दीड हजार शेतकऱ्यांनी फोन केले आहेत. एकाच वेळी राज्यातील अनेक शेतकरी फोन करत असल्यामुळे तो क्रमांक सततच्या फोनमुळे व्यस्त असल्याचे दिसून येते. 

सोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमाद्वारे व सोशल मिडियाच्या माध्यमातून आपला मोबाईल क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला होता. त्या फोनवर गेल्या पाच दिवसांमध्ये जवळपास दीड हजार शेतकऱ्यांनी फोन केले आहेत. एकाच वेळी राज्यातील अनेक शेतकरी फोन करत असल्यामुळे तो क्रमांक सततच्या फोनमुळे व्यस्त असल्याचे दिसून येते. 

शेतकरी संपानंतर राज्य शासनाने खरीप हंगामाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये कर्ज देण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी 9923333344 हा मोबाईल क्रमांक दिला होता. त्या क्रमांकावर शेतकऱ्यांनी कर्जाच्या संदर्भात असलेल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले होते. त्याचबरोबर सोशल मिडीयावरुनही तो क्रमांक सर्व ग्रुपवर व्हायरल केला होता. त्याचा परिणाम एवढा मोठा झाली की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी त्या मोबाईल क्रमांकावर फोन करू लागला. त्यामुळे सतत तो क्रमांक व्यस्त असल्याचे स्पष्ट होत आहे. सकाळी सात वाजल्यासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत हा मोबाईल क्रमांक सुरू असतो. 

राज्यात एक कोटी 31 लाख एवढी शेतकरी संख्या आहे. पहिल्याच मंत्र्याने स्वतःचा फोन देऊन त्यावर फोन करण्याचे आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यावर फोन करण्यास सुरवात केली. एकाच वेळी जास्त फोन येत असल्यामुळे तो क्रमांक सतत व्यस्त असतो. त्यामुळे पणन मंडळाच्यावतीने दुसरी हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यांच्या 18002330244 या क्रमांकावरही शेतकरी आपल्या शंका विचारू शकतात. बॅंकांच्या संदर्भात त्यांच्या काही अडचणी असल्यास त्या या हेल्पलाइनवरुन विचारल्या जाऊ शकतात.

15 जूनला माझा मोबाईल क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुला केला. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास दीड हजार लोकांनी संपर्क साधला आहे. त्या शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले आहे. एकाच वेळी अनेक शेतकरी फोन करत असल्याने तो क्रमांक बंद किंवा व्यस्त असल्याचे सांगतो. त्यावर मात करण्यासाठी दुसरी हेल्पलाइन सुरू केली आहे. दिवसाला जवळपास 300 शेतकऱ्यांशी संपर्क होतो. त्यांची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. 
सुभाष देशमुख, सहकारमंत्री. 

Web Title: five days thousands call esakal news