शाळांच्या दुरुस्तीसाठी साडेपाच कोटी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

सातारा - जिल्हा परिषदेच्या 340 प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे भीषण वास्तव "सकाळ'ने मांडले. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यास निधी द्यावा, यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळांच्या इमारत दुरुस्तीसह नव्या खोल्या बांधकामासाठी पाच कोटी 65 लाखांच्या निधीची तरतूद चालू आर्थिक वर्षात केली आहे. 

उद्याचा भारत घडविण्याचे काम शिक्षण करत असले, तरी शासन स्तरावरून ज्ञानदान करणाऱ्या "मंदिरांचे' वास्तव्य विचित्र होऊ लागले आहे. खासगी शाळांच्या इमारती टकाटक दिसतात, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची दयनीय अवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या 340 शाळांच्या खोल्यांची दुरवस्था झाल्याचे वास्तव "सकाळ'ने नुकतेच मांडले. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी निधी मिळण्यासाठी सातत्याने शासन, जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. डॉ. शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेत रुजू होताच बांधकाम विभागाला शाळा इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 340 शाळांतील सुमारे 645 शाळा खोल्या धोकादायक, दुरुस्तीलायक असल्याचे समोर आले होते. काही इमारतींच्या जीर्ण भिंती, गळके छत, भिंतीला तडे, खराब पत्रे, खराब दरवाजे अशी विदारक स्थिती निदर्शनास आली. जिल्हा परिषद सेस फंडातून एक कोटी 32 लाख रुपयांची तरतूद केली असून, त्यातून 64 शाळांची दुरुस्ती, तर जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी 65 लाखांची तरतूद केली असून, त्यातून 110 शाळांच्या इमारतींची दुरुस्ती होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या दोन कोटी निधीतून 21 शाळा खोल्याही चालू आर्थिक वर्षात बांधल्या जाणार आहेत, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी एच. व्ही. जाधव यांनी दिली. 

शाळा दुरुस्तीस निधी 

1.4 कोटी  - झेडपी सेस फंड 

2.65 कोटी  - डीपीसी फंड 

Web Title: Five hundred and fifty crores for the maintenance of the zp schools