भुईंजमध्ये सापडल्या पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा

विलास साळुंखे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

बाजीराव आण्णा मोरे (वय 50) यांस अटक करण्यात आली आहे, त्याच्याकडून एम एच 06 यू 2228 हे वाहन जप्त करण्यात आले आहे. नोटांचा तपशील असा 500 रुपयांच्या 800 तसेच हजार रुपयांच्या 597 नोटा असे मिळून 9 लाख 97 हजार रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.

भुईंज- पाचवड (ता. वाई) येथे चलनातून बंद झालेले पाचशे व हजार रुपयांच्या नोटा असे 10 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी रानेघर (ता.जावली) येथील बाजीराव मोरे यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बाजीराव आण्णा मोरे (वय 50) यांस अटक करण्यात आली आहे, त्याच्याकडून एम एच 06 यू 2228 हे वाहन जप्त करण्यात आले आहे. नोटांचा तपशील असा 500 रुपयांच्या 800 तसेच हजार रुपयांच्या 597 नोटा असे मिळून 9 लाख 97 हजार रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.

दरम्यान, सोमवारी रात्री आठला जुन्या नोटा घेऊन नवीन नोटा बदली करण्यासाठी मोरे येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून भुईंज पोलिस यांना मिळाली होती. त्यानुसार, पाचवड येथील बैल बाजारात पोलिसांनी सापळा रचला व मोरे यास ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडील बॅगेत 10 लाख रुपये आढळले. रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यात येत होती. आज (मंगळवार) सकाळपासून त्याची चौकशी सुरूच ठेवली आहे.

Web Title: Five hundred and thousands old notes found in Bhuinj

टॅग्स