विट्यात पाचशेच्या नोटांना घड्या घालताच तुटून पडण्याचा प्रकार

विट्यात पाचशेच्या नोटांना घड्या घालताच तुटून पडण्याचा प्रकार

विटा - येथे पाचशेच्या साडेतीन हजार रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुटून पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत विट्यातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांना या नोटा दाखवून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने तत्काळ याची दखल घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की श्री. राठोड यांच्या घराशेजारी किसाबाई विलास शिंदे (वय ६०, रा. लक्ष्मीनगर, विटा) राहतात. त्या मोलमजुरी करतात.  त्यांनी दीड महिन्यापूर्वी लोखंडी कपाटात पाकिटात सात हजार रुपये ठेवले होते. काल त्यातील साडेतीन हजार रुपये रुमालात बांधून घेऊन मिरच्या आणण्यासाठी त्या बाजारात गेल्या होत्या. रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून पाचशेची एका नोटची घडी पडून तुकडा पडला. त्यानंतर त्यांनी दुसरी नोट काढली असता त्या नोटीचीसुद्धा घडी पडताच ती तुटली. त्यानंतर त्यांनी सर्व नोटा घडी करून पाहिले असता त्या नोटांचे तशाच प्रकारे तुकडे पडत असल्याचे दिसले.

त्यांनी शेजारी राहणाऱ्या श्री. राठोड यांना झाला प्रकार सांगितला. त्यांनीही नोटांच्या घड्या घालून पाहिले असता नोटांचे तुकडे पडत असल्याचे दिसून आले. त्यांनी विट्यातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक श्री. दळवी यांची भेट घेतली व नोटांच्या झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी संबंधित नोटा या केमिकलच्या अथवा अति उष्णतेच्या संपर्कात आल्या असाव्यात, असे सांगत आमच्या शाखेत आलेल्या करोडो रुपयांच्या अशा प्रकारच्या नोटा या वर्षानुवर्षे कपाट बंद असतात. त्यांना काहीही होत नाही असे सांगितले. परंतु, श्री. राठोड यांनी हा प्रकार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणावा, असे सांगितले. श्री. राठोड यांना एका बाजूने तुटलेली नोट बदलून देण्यात आली. परंतु, उरलेले तीन हजार रुपयांचे तुकडे आम्ही बदलून देऊ शकत नाही, असे उत्तर दिले. नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या पूर्वीच्या नोटांच्या तुलनेत हलक्‍या दर्जाच्या आहेत, असे शाखा व्यवस्थापकांनी मान्य केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com