"लोटस'तर्फे विद्यार्थ्यांना पाच लाखाची मदत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सोलापूर - लोकमंगल फाउंडेशन संचालित लोटस या शैक्षणिक अर्थ सहाय्य करणाऱ्या विभागामार्फत 19 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाच लाख रुपयांचे शैक्षणिक अर्थसाहाय्य दिले आहे. 

सोलापूर - लोकमंगल फाउंडेशन संचालित लोटस या शैक्षणिक अर्थ सहाय्य करणाऱ्या विभागामार्फत 19 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाच लाख रुपयांचे शैक्षणिक अर्थसाहाय्य दिले आहे. 

लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख व सोलापूर विद्यापीठाचे प्रा. डॉ. अभिजित जगताप यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्याचा धनादेश देण्यात आला. यावेळी रोहन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी व भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत लोटसतर्फे शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन स्वतःच्या भविष्यासोबतच देशाचे जबाबदार नागरिक व्हावे असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. 

यावेळी मीरा माने, स्नेहल कबाडे, स्नेहा कलशेट्टी, नीलेश माळी, प्रतीक्षा माने, अक्षय क्षीरसागर, दीपाली दिंडोरे, शिवानी धबडे, राधा गवळी, मंगेश नाईक, पांडुरंग ताकमोगे, कोमल गुंड, अभय गुंड, श्रीधर कुलकर्णी, सिकंदर बागवान, अजय वाघमोडे, पूजा आगलावे, ओंकार सातपुते, चांगदेव रोकडे या विद्यार्थ्यांना धनादेश दिले. यावेळी फाउंडेशनचे संचालक इंद्रजित पवार, पांडुरंग ताकमोगे, जयवंत थोरात, प्रा. व्ही. पी. मोरे, नगरसेवक संतोष भोसले उपस्थित होते. डॉ. प्रवीण ननवरे यांनी प्रास्ताविक केले. माणिकराव भोसले यांनी आभार मानले. 

Web Title: Five lakhs of help from Lotus for students