बालनाट्य स्पर्धेसाठी राज्यात होणार नव्याने पाच केंद्रे

तात्या लांडगे
रविवार, 1 डिसेंबर 2019

■ राज्यातून मागविले प्रस्ताव

■ डिसेंबरमध्ये सोलापुरात लोकवाद्यांचा महोत्सव

■ सोलापुरात बालनाट्य केंद्राची मागणी

सोलापूर : राज्यातील प्रत्येक विभागात बालनाट्य स्पर्धेचे केंद्र आहेच, मात्र वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून या स्पर्धेत सादर होणाऱ्या बालनाट्यांची संख्या लक्षात घेता राज्यात आगामी काळात पाच नवी केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमधून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्राप्त प्रस्तावाचे क्‍लबिंग करुन 200 किलोमीटरपर्यंतची मर्यादा घालून प्रत्येक विभागात एक बालनाट्य केंद्र सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती सांस्कृतिक कला संचलनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

हेही वाचा -

गाव पुढारी लागले कामाला 

सोलापूर भागातून पुणे केंद्रावर12 तर औरंगाबाद केंद्रावर 40 बालनाट्य सादर होतात. सोलापूरातच बालनाट्य केंद्र व्हावे, अशी येथील कलावंतांची मागणी आहे.

कसं काय बुवा? -

दोन पोलिस लाचेच्या जाळ्यात

नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी नाट्य केंद्रे आहेत. मात्र, बालकांमधील कलेला वाव मिळावा, त्यांच्या कलेचा अविष्कार व्हावा या उद्देशाने बालनाट्य केंद्रे उभारण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. तत्पूर्वी, लोप पावत असलेल्या लोककलांचेही संवर्धन करण्याचे काम सुरु असून त्यासाठी राज्यातील नऊ विद्यापीठांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. दरम्यान, स्कूल ऑफ ड्रामाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे मात्र, त्याला अद्याप शासनाकडून मान्यता मिळालेली नाही, असेही श्री. चवरे यांनी या वेळी सांगितले. कलाकारांना त्यांच्या केलेची व वैयक्‍तिक माहिती संचालनालयापर्यंत पोहचविता यावी, या हेतूने 'कलाकार कट्टा' ही वेबसाईट तयार करण्याचे काम हाती घेतल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्यातील कला संस्थांचे फिजिकल व्हेरिफिकेशनही केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डिसेंबरमध्ये सोलापुरात लोकवाद्यांचा महोत्सव
पारंपारिक लोकवाद्यांचे स्थान कायम राहावे, कलाकारांनाही संधी मिळावी या उद्देशाने डिसेंबर 2019 मध्ये सोलापुरात पारंपारिक लोकवाद्याचा लोकमहोत्सव आयोजित करण्याचे नियोजन सांस्कृतिक कला संचालनालयाने केले आहे. त्यामध्ये संबळ, सुंदरी, हलगी, शहनाई यासह अन्य वाद्यांचा समावेश असणार आहे, असे सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five news centers proposed for balnatya competition

फोटो गॅलरी