चंदगड-तिलारी घाटात कार कोसळून पाच जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

तिलारीजवळ असलेल्या घाटात कोदाळी येथील लष्कर पॉईंटवरुन पाच युवक गाडीसह दरीत कोसळले. बेळगाव येथील रहिवाशी असलेले हे युवक वर्षांसहलीचा आनंद लुटण्यासाठी आले होते.

कोल्हापूर : चंदगड-तिलारी घाटातून वॅगनार कार दरीत कोसळून अपघात झाल्याची दुर्घटना आज (ता.8) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या अपघातमध्ये कारमधील पाचही युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती चंदगड पोलिसांनी दिली.  

तिलारीजवळ असलेल्या घाटात कोदाळी येथील लष्कर पॉईंटवरुन पाच युवक गाडीसह दरीत कोसळले. बेळगाव येथील रहिवाशी असलेले हे युवक वर्षांसहलीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. अपघाताचे कारण अद्याप निष्पन्न झाले नाही. तसेच त्यांची नावे समजली नाहीत. घटनास्थळी पोलिस पोहचले असून, मदतकार्य चालू आहे. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिस व कोदाळीचे ग्रामस्थ करीत आहेत. 

Web Title: Five people died in road accident in Chandgad Tilari valley